शाहरुख खानने जेव्हा अनंत अंबानी यांना विचारली पहिली कमाई, मिळालेलं उत्तर म्हणजे…

Anant Ambani First Salary | शाहरुख खान याने स्वतःची पहिली कमाई सांगत 9.6 लाख कोटी रुपयांच्या मालकाच्या मुलाला विचारली पहिली कमाई, मुकेश अंबानी यांच्या मुलाने किंग खान याला दिलेलं उत्तर म्हणजे..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंनंत आणि शाहरुख खान याची चर्चा...

शाहरुख खानने जेव्हा अनंत अंबानी यांना विचारली पहिली कमाई, मिळालेलं उत्तर म्हणजे...
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 12:02 PM

अनंत अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील 9 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे सर्वात लहान पूत्र आहेत. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. अंबानी कुटुंबाचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत देखील खास संबंध आहेत. अंबानी कुटुंब आणि अभिनेता शाहरुख खान यांचे देखील एकमेकांसोबत संबंध चांगले आहेत. अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात शाहरुख खान त्याच्या कुटुंबासोबत उपस्थित असतो. आता देखील अनंत अंबानी आणि शाहरुख खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनंत अंबानी आणि शाहरुख खान त्यांच्या पहिल्या कमाईबद्दल बोलताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार, अंबानी कुटुंबाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आयोजित कार्यक्रमात दोघे एकमेकांच्या पहिल्या कमाईबद्दल बोलताना दिसत आहेत.

सर्वात आधी अनंत अंबानी किंग खान याला त्याच्या पहिल्या कमाईबद्दल विचारतात. यावर शाहरुख खान म्हणतो, दिल्लीमध्ये राहायला असताना सिनेमांचे तिकिट विकून अभिनेत्याने 50 रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर शाहरुख याने अनंत अंबानी यांना त्यांच्या पहिल्या कमाईबद्दल विचारलं.

हे सुद्धा वाचा

अनंत अंबानी यांनी पहिल्या कमाईबद्दल किंग खान याला जे उत्तर दिलं ते थक्क करणारं आहे. अनंत अंबानी म्हणाले, ‘राहूद्या तुम्हाला लाज वाटेल…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि शाहरुख खान यांच्या कमाईची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खान आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक

फोर्ब्सने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, भारतात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्याच्या यादीत शाहरुख खान अव्वल स्थानी आहे. शाहरुख खान याची नेटवर्थ 6400 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. अभिनेता एका सिनेमासाठी जवळपास 150 ते 200 कोटी रुपये मानधन घेतो. शिवाय चाहत्यांमध्ये शाहरुख खान याची असलेली क्रेझ दिवसागणिक वाढत आहे.

अनंत अंबानी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, फोर्ब्सनुसार, अनंत यांचे वडील मुकेश अंबानी हे 9.6 लाख कोटी रुपयांचे मालक आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वी जामनगर याठिकाणी मोठ्या थाटात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सेलिब्रेशन मोठ्या थाटात पार पडाला… प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न जुलैमध्ये होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.