Shah Rukh Khan | जेव्हा किंग खान याला वाटलं गौरी घेईल शेवटचा श्वास; शाहरुखच्या आयुष्यातील ‘तो’ वाईट दिवस
'त्या' क्षणी गौरी हिला गमावण्याची भीती किंग खानच्या मनात अधिक होती... शाहरुख खान याला वाटलं आता पत्नी अखेरचा श्वास घेईल, पण..., सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...
मुंबई | अभिनेता शाहरुख खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला किंग खान त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतो. आज किंग खान याचे चाहते फक्त भारत देशातच नाही तर, साता समुद्रा पार देखील आहेत. यामुळेच शाहरुख खान याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आज शाहरुख याच्या मुलांनी देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. ज्यामुळे शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान दोघे आनंदी आहेत. पण किंग खान याच्या आयुष्यात एक दिवस आसा आला होता जेव्हा पत्नीला गमावण्याची भीती अभिनेत्याच्या मनात अधिक होती.
शाहरुख खान याच्यासाठी पत्नी सर्वकाही आहे. शाहरुख आणि गौरी यांच्या लव्हस्टोरीबद्दल तर अनेकांना माहिती आहे. एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे दोघांची लव्हस्टोरी आहे. दरम्यान ३० सप्टेंबर १९९८ साली ‘फिल्मफेअर’ ला दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खान याने आयुष्यातील सर्वात वाईट क्षणाबद्दल सांगितलं.
अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा गौरी ऑपरेशन थिएटरमध्ये होती, तेव्हा तिची प्रकृती पाहून असं वाटलं की गौरी आता अखेरचा श्वास घेईल. मी माझ्या आई – वडिलांना रुग्णालयात अखेरचा श्वास घेताना पाहिलं होतं. ज्यामुळे माझ्या मनात एक भीती बसली होती आणि मला रुग्णालयाची प्रचंड भीती वाटत होती. ‘
‘आर्यन याच्या जन्मावेळी मी प्रचंड घाबरलो होते. कारण गौरी हिची प्रकृती खालावली होती. गौरीला वेदना सहन होत नव्हत्या. रुग्णायलात गौरीला अशा अवस्थेत पाहणं माझ्यासाठी प्रचंड कठीण होतं. तेव्हा मी होणाऱ्या बाळाची बिलकूल चिंता केली नाही. तेव्हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त गौरी महत्त्वाची होती..’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘मला माहिती होतं मुल जन्माला येताना काहीही होत नाही, पण तरी देखील माझ्या मनात भीती होती. अशा परिस्थितीत सर्वात उत्तम पर्याय म्हणजे, पत्नीसोबत खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.. शाहरुख खान याच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे…
शाहरुख खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेता तुफान चर्चेत आहे. शाहरुख खान याने चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण केल्यामुळे ‘पठाण’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहांत गर्दी केली. आता किंग खान याच्या ‘जवान’ सिनेमाला प्रेक्षक किती प्रेम देतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.