अभिनेत्री कतरिना कैफ हिचं नाव सुरुवातील अभिनेता सलमान खान आणि त्यानंतर अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत जोडलं गेलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. रणबीर कपूर याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर कतरिना हिने अनेक वाईट गोष्टींचा सामना केला. अखेर कतरिना हिच्या आयुष्यात अभिनेता विकी कौशल याची एन्ट्री झाली. कतरिना आणि विकी यांनी 9 डिसेंबर 2021 मध्ये राजस्थान याठिकाणी शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
लग्नानंतर विकी – कतरिना यांना अनेकदा कुटुंबियांसोबत देखील स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, कतरिना हिने सासरे आणि विकीचे वडील शाम कौशल कायम सून कतरिना हिचं कौतुक करताना दिसतात. सोशल मीडियावर कौशल कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
एका मुलाखतीत शाम कौशल यांनी ‘कतरिना आमच्या घरातील सून नाही तर, मुलगी आहे… आमच्या घरात मुलगी आली आहे…’ असं वक्तव्य केलं होतं. ‘कतरिना आता पंजाबी संस्कृती शिकत आहे. पंजाबी शिकत आहे. आम्ही आता वेग-वेगळ्या भाज्या खातो कारण कतरिनाला भाज्या खूप आवडतात…’
पुढे शाम कौशल म्हणाले, ‘आता लोकं मला जेव्हा विचारतात आता मी माझी ओळख कशी करुन दिली पाहिजे? तेव्हा मी लोकांना सांगतो, मी आता स्टंटमॅन नाही तर, विकी – सनी यांचा बाप आणि कतरिना कैफ हिचा सासरा आहे.’ असं देखील शाम कौशल एका मुलाखतीत म्हणाले होते.
कतरिना कैफ हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील कतरिना कायम चर्चेत असते. कतरिना सोशल मीडियावर कायम विकीसोबत फोटो पोस्ट करत पतीवर असलेलं प्रेम व्यक्त करत असते.
कतरिना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर कतरिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.