Shatrughan Sinha : ‘तिच्यासोबत चुकीचं केलं…’, शत्रुघ्न सिन्हा यांना कसला होतोय पश्चाताप?
Shatrughan Sinha : 'तिच्यासोबत चुकीचं केलं...', जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी केला मोठा खुलासा, त्यांना होतोय पश्चाताप? शत्रुघ्न सिन्हा गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वात सक्रिय आहे... नुकताच, ते सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नामुळे चर्चेत आले होते.
दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा गेल्या काही दिवसांपासून मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं आहे. सोनाक्षी – झहीर यांनी कोर्ट मॅरिज केलं असून बॉलिवूडकरांसाठी रिसेप्शनपार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टीमध्ये अभिनेत्री रेखा यांनी देखील हजेरी लावली होती. पार्टीमध्ये रेखा यांना पाहिल्यानंतर सिन्हा कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील आनंद झाला. कारण एक काळ असा होता, जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांच्यातील वाद टोकाला पोहोचले होते.
रेखा यांच्यासोबत असलेल्या वादाबद्दल खुद्द शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. ‘मी रेखा यांच्यासोबत फार चुकीचं केलं… मला असं करायला नव्हतं हवं होतं…’, सांगायचं झालं तर, शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांनी एकत्र करियरची सुरुवात केली. ‘दो यार’ सिनेमात दोघांनी मुख्य भूमिका होती. सिनेमात रेखा मुख्य भूमिकेत होत्या, तर शत्रुघ्न सिन्हा यांनी खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला.
दरम्यान, दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या ‘खून भरी मांग’ सिनेमाच्या सेटवर दोघांमधील वाद टोकाला गेले. त्यानंतर कित्येक वर्ष दोघांनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नाही. शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांनी जवळपास 20 वर्ष एकमेकांसोबत कोणताच संपर्क ठेवला नव्हता.
कोणत्याही पार्टी किंवा कार्यक्रमात एकत्र असले तरी शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा दोघे एकमेकांकडे पाहायचे देखील नाहीत. एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘मी रेखा यांच्या विरोधात खूप काही बोललो… मी जे काही बोललो ते मी नव्हतं बोलायला हवं होतं….’
पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘रेखा कधीच मला उलटून काहीही बोलल्या नाहीत. रेखा यांचं मन फार मोठं आहे.’ रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम आणि रेखा चांगल्या मैत्रिणी आहे. पूनम यांनी शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांच्यातील वाद मिटवले.
शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘रामपुर के लक्ष्मण’, ‘दो यार’, ‘कशमकश’, ‘कहते हैं मुझको राजा’, ‘जानी दुश्मन’, ‘परमात्मा’, ‘माटी मांगे खून’, ‘मुकाबला’ आणि ‘चेहरे पे चेहरा’ यांसख्या सिनेमामध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा झळकले आहेत.