Shilpa Shetty | “त्याने माझा वापर केला अन्..”; ब्रेकअपनंतर अक्षय कुमारवर शिल्पा शेट्टीचे गंभीर आरोप

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने 2001 मध्ये लग्न केलं. तर शिल्पा शेट्टीने व्यावसायिक राज कुंद्राशी 2009 मध्ये लग्नगाठ बांधली. पॉर्नोग्राफी प्रकरणादरम्यान शिल्पा आणि राजच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. मात्र त्यावर शिल्पाने मौन बाळगणं पसंत केलं.

Shilpa Shetty | त्याने माझा वापर केला अन्..; ब्रेकअपनंतर अक्षय कुमारवर शिल्पा शेट्टीचे गंभीर आरोप
Shilpa Shetty and Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 10:59 AM

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्री आणि आपल्या फिटनेसने सर्वांनाच चकीत करणारी शिल्पा शेट्टी आज (8 जून) 47 वा वाढदिवस साजरा करतेय. शिल्पा तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. पती राज कुंद्राच्या अश्लील व्हिडीओग्राफी प्रकरणामुळेही ती चर्चेत होती. मात्र हे संपूर्ण प्रकरण तिने अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणे हाताळलं होतं. लग्नापूर्वी शिल्पाचं नाव बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. त्यापैकीच एक नाव बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचं होतं. ‘धडकन’ या चित्रपटातील शिल्पा आणि अक्षयची जोडी तुफान गाजली होती. मात्र या चित्रपटानंतर दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं नाही.

त्याकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत शिल्पा आणि अक्षयच्या अफेअरची तुफान चर्चा होती. मात्र या दोघांचं नातं एका वाईट वळणावर येऊन संपलं. ब्रेकअपनंतर शिल्पा शेट्टी पूर्णपणे खचली होती. एका मुलाखतीत तिने असाही दावा केला होता की अक्षय कुमारने तिची फसवणूक केली होती. त्यामुळे दोघांचा ब्रेकअप झाला होता. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी ज्यावेळी रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हाच अक्षयची भेट ट्विंकल खन्नाशी झाली. या दोघांनी ‘इंटरनॅशनल खिलाडी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अक्षयला नंतर ट्विंकल इतकी आवडली की त्याने चित्रपटाच्या सेटवरच तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर काही महिन्यांतच दोघांनी लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

दोघांच्या लग्नानंतर शिल्पाने अक्षयसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. एका मुलाखतीत ती म्हणाली होती, “जेव्हा मी अक्षयला भेटले तेव्हा तो माझं सर्वस्व आहे असं मला वाटलं होतं. जर हे नातं संपलं तर मीसुद्धा संपेन असं मला वाटलं होतं. पण ते नातं टिकलं नाही याचं मला आज समाधान आहे. मला ट्विंकलशी कोणतीच तक्रार नाही, कारण यात तिची काहीच चूक नाही. जर माझाच बॉयफ्रेंड माझी फसवणूक करत असेल तर यात दुसऱ्या महिलेचा काय दोष? अक्षयने माझा वापर केला आणि जेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आली तेव्हा त्याने मला सोडलं.”

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने 2001 मध्ये लग्न केलं. तर शिल्पा शेट्टीने व्यावसायिक राज कुंद्राशी 2009 मध्ये लग्नगाठ बांधली. पॉर्नोग्राफी प्रकरणादरम्यान शिल्पा आणि राजच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. मात्र त्यावर शिल्पाने मौन बाळगणं पसंत केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.