Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol | ‘फक्त मुजरेवालीच लग्नात नाचतात’; सनी देओलच्या टिप्पणीनंतर शाहरुखने दिलं होतं सडेतोड उत्तर

या मुलाखतीत त्याने अप्रत्यक्षपणे शाहरुख खानवर निशाणा साधला होता. त्यावेळी शाहरुख अनेक सेलिब्रिटींच्या लग्नात डान्स परफॉर्म करत असे. त्यासाठी तो भरभक्कम मानधन सुद्धा घ्यायचा. यावरूनच सनी देओलने टिप्पणी केली होती.

Sunny Deol | 'फक्त मुजरेवालीच लग्नात नाचतात'; सनी देओलच्या टिप्पणीनंतर शाहरुखने दिलं होतं सडेतोड उत्तर
Sunny Deol and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 12:42 PM

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी गदर 2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तब्बल 22 वर्षांनंतर सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान त्याची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्याने अप्रत्यक्षपणे शाहरुख खानवर निशाणा साधला होता. त्यावेळी शाहरुख अनेक सेलिब्रिटींच्या लग्नात डान्स परफॉर्म करत असे. त्यासाठी तो भरभक्कम मानधन सुद्धा घ्यायचा. यावरूनच सनी देओलने टिप्पणी केली होती.

जुन्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला होता, “तुम्ही जेव्हा इतरांच्या लग्नात नाचता तेव्हा मानसन्मान गमावता. आत ही गोष्ट जरी फॅशनेबल झाली असली तरी त्यामुळे संबंधित व्यक्ती आत्मसन्मान गमावते असं मला वाटतं. आपण अभिनेते आहोत, तमाशा करणारे नाही. फक्त मुजरावाले लग्नात नाचतात, अभिनेते नाही. मला असं वाटतं की कलाकारांनी त्यांचा मान जपला पाहिेजे. मित्रमैत्रिणींच्या लग्नात नाचणं ठीक आहे, पण पैसे घेऊन नाचणं खूप खालच्या पातळीचं आहे. पुढे तुम्ही मला विचाराल की बाजारातून पैसे उधार घेण्यापेक्षा वेश्याव्यवसाय चांगला नाही का? तर मी अशा प्रकारच्या तर्काशी सहमत नाही.”

सनी देओलच्या या टिप्पणीवर त्यावेळी शाहरुखनेही उत्तर दिलं होतं. “त्या गोष्टीला पैसा जोडलेला आहे, कारण तोच पैसा मी माझे स्वत:चे चित्रपट बनवण्यासाठी वापरतो. त्यामुळे मला चित्रपट बनवण्यासाठी इतरांकडे पैसा मागावा लागत नाही. कोणत्याही व्यक्तीसाठी लग्न हा खूप आनंदाचा क्षण असतो आणि त्यात सहभागी व्हायला मला खूप आवडतं. या जगातील फक्त श्रीमंत व्यक्तींनाच मी परवडू शकतो”, असं शाहरुख म्हणाला होता. सनी देओल आणि शाहरुख खान यांनी ‘डर’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र या वादावादीनंतर दोघजण जवळपास 16 वर्षे एकमेकांशी बोलले नाहीत.

हे सुद्धा वाचा

सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्येही फार उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘गदर 2’ची जोरदार ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा होत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. यामध्ये भारतातील तरुण आणि पाकिस्तानची तरुणी यांच्यातील प्रेम कहाणी दाखवण्यात आली होती. आता त्याचीच पुढील कथा सीक्वेलमध्ये मांडण्यात येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.