Sunny Deol | बॉबीच्या ‘या’ वागणुकीमुळे सनी देओलने उचलला होता त्याच्यावर हात; मुलाखतीत केला खुलासा

2018 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दोघंही कलाकार त्याचं जबरदस्त प्रमोशन करत होते. त्यादरम्यान एका रिपोर्टरने सनी देओलला हा प्रश्न विचारला की, त्याने कधी छोटा भाऊ बॉबीवर हात उचलला होता का? त्यावर सनीने सांगितलं..

Sunny Deol | बॉबीच्या 'या' वागणुकीमुळे सनी देओलने उचलला होता त्याच्यावर हात; मुलाखतीत केला खुलासा
Sunny and Bobby DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 4:04 PM

मुंबई : अभिनेता सनी देओल त्याच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटात प्रेक्षकांना सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी एकत्र पहायला मिळणार आहे. 23 वर्षांनी ‘गदर’चा सीक्वेल प्रदर्शित होतोय. नुकतंच सनी देओलचा मुलगा करण देओलचं लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. करणच्या संगीत कार्यक्रमात देओल कुटुंबातील विविध सदस्यांनी धमाकेदार डान्ससुद्धा केला होता. सनी देओलसोबतच त्याचा छोटा भाऊ बॉबीनेही या कार्यक्रमात पत्नीसोबत रोमँटिक डान्स केला होता. सनी आणि बॉबी यांच्यातील बाँडींग सहज पहायला मिळते. मात्र या दोघांचा एक किस्सा क्वचितच कोणाला माहीत असेल. आपल्या अँग्री मॅनच्या अंदाजासाठी ओळखला जाणाऱ्या सनी देओलने एकदा बॉबी देओलला मारलं होतं.

सनी देओलने मोठ्या पडद्यावर जरी रागीट भूमिका साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात तो खूप शांत आहे. मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे त्याचा संयम सुटला. बॉबीवर तो इतका रागावला होता, की रागाच्या भरात त्याने छोट्या भावाला खूप मारलं. सनी आणि बॉबीने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘यमला पगला दिवाना’. यामध्ये दोघांचे वडील धर्मेंद्रसुद्धा झळकले होते. या चित्रपटाचे दोन भाग आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

2018 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दोघंही कलाकार त्याचं जबरदस्त प्रमोशन करत होते. त्यादरम्यान एका रिपोर्टरने सनी देओलला हा प्रश्न विचारला की, त्याने कधी छोटा भाऊ बॉबीवर हात उचलला होता का? त्यावर सनीने सांगितलं, “तो माझ्यापेक्षा बराच लहान आहे आणि असं फार क्वचितच झालं असेल की मी त्याच्यावर हात उचलला असेन.” हे ऐकून बॉबी देओल म्हणतो, “एकदा भावाने मला मारलं होतं. तेव्हा मी शाळेत होतो आणि माझ्या ट्युशन टीचरने भावाकडे तक्रार केली होती. मी नीट अभ्यास करत नाही, असं त्यांनी भावाला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी मला बोलावून त्यामागचं कारण विचारलं. मी उत्तर दिलं नाही म्हणून त्याने मला मारलं होतं.”

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.