भारतीय क्रिकेट संघाने नुकताच टी 20 वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरलं आहे. जेव्हा टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी भारतीय क्रिकेट संघाला विजयी घोषित करत देण्यात आली… तो क्षण प्रत्येक भारतीय नागरिकासाठी गर्वाचा क्षण होता. त्या दिवसाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर मोहम्मद सिराज देखील तुफान चर्चेत आला आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे सिराज चर्चेत आला आहे.
सांगायचं झालं तर, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचं हैदराबाद याठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी दाखवल्यानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी सिराज याला सरकारी नोकरी आणि एक प्लॉट देण्याची घोषणा केली आहे.
सर्वत्र मोहम्मद सिराज याची चर्चा रंगलेली असताना नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर क्रिकेटरला टॅग करत एक प्रश्न विचारला आहे. ‘तिने तुला शुभेच्छा दिल्या नाहीत का?’ जिच्याबद्दल चाहते सिराजला प्रश्न विचारत आहेत ती महिला दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री श्रद्ध कपूर आहे. एक काळ असा होता जेव्हा सिराज आणि श्रद्धा यांच्या नात्याची चर्चा रंगली होती.
श्रद्धा कपूर कायम सिराज याच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत असते. एकदा तर श्रद्धा हिने फोटो पोस्ट करत सिराजवर नाराजी देखील व्यक्त केली होती. हे प्रकरण आशिया कप दरम्यानचं आहे. जेव्हा सिराजने श्रीलंकेविरुद्ध 21 धावांत 6 बळी घेतले होते. संपूर्ण संघ केवळ 50 धावांवरच मर्यादित राहिला होता.
तेव्हा सामना लवकर संपल्यामुळे श्रद्धा कपूर हिने कारमध्ये बसून एक फोटो पोस्ट केला होता. फोटो पोस्ट अभिनेत्रीने सिराजवर नाराजी व्यक्त केली होती. ‘आता सिराजलाच विचारा या रिकाम्या वेळेत करायचं काय?’ तेव्हा देखील श्रद्धा आणि सिराज यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगल्या होता. पण आता श्रद्धा लेखक आणि राहुल मोदी याला डेट करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. श्रद्धा सोशल मीडियावर देखील तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांना सांगत असते. श्रद्धा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.