‘अभिनेता, दिग्दर्शक, निर्मात्यासोबत कॉम्प्रोमाइजचा नियम…’, ‘या’ अभिनेत्रीकडून पडद्यामागचं काळ सत्य समोर

'मोठ्या पडद्यावर संस्कृती, रितीरिवाज, कपड्यांचा सन्मान राखतात, पण पडद्या मागे फक्त...', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीचं काळं सत्य समोर...

'अभिनेता, दिग्दर्शक, निर्मात्यासोबत कॉम्प्रोमाइजचा नियम...', 'या' अभिनेत्रीकडून पडद्यामागचं काळ सत्य समोर
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 1:07 PM

मुंबई | 22 जुलै 2023 : आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रात काम करत असताना आलेले धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. ज्यामुळे इंडस्ट्रीचं काळं सत्य सर्वांसमोर आलं. ज्यामुळे अनेक अभिनेत्रींना त्यांच्या स्वप्नांचा त्याग करावा लागला. पण काही अभिनेत्रींनी प्रत्येक संकटावर मात करत इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. पण आता टीव्ही विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉलिवूडच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वाबद्दल देखील मोठ्यं सत्य समोर आणलं आहे. कोल्डड्रिंक्समध्ये नशेचे पदार्थ मिसळून अभिनेत्रीला देण्यात आले होते. पण अभिनेत्रीने या भयानक प्रसंगातून स्वतःची सुटका केली. हा धक्कादायक अनुभव सांगणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रतन राजपूत आहे.

दाक्षिणात्य सिनेविश्वातील कास्टिंग काऊचबद्दल रतर हिने मोठा खुलासा केला आहे. ‘अगले जनम मोहे बिटीया ही किजो’, ‘राधा की बेटीया कुछ कर दिखाएंगी’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री रतन राजपूत हिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून फोन यायचे. अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी मला फोन केले. पण ते म्हणायचे रतन तुला थोडं वजन वाढवावं लागेल.. तू खूपच बारीक आहेस… माझं वजन वाढवण्यायासाठी मी तयार झाली होती…’

हे सुद्धा वाचा

पण पुढे दिग्दर्शक असं काही म्हणाले, ज्यामुळे रतन हिला मोठा धक्का बसला, ‘जर वजन वाढलं नाही तर कॉम्प्रोमाइज करावं लागेल.. तुला इंडस्ट्रीचा नियम माहिती असेलच. तर मी त्यांना स्पष्ट विचारलं, यावर ते म्हणले, दिग्दर्शक, निर्माता, मुख्य अभिनेता, कदाचित डीओपीसोबत देखील…’ मी स्पष्ट शब्दांमध्ये विचारलं तर मला समोरून उत्तर आलं, ‘तुला माहिती आहे, याठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागेल…’

पुढे रतन म्हणाली, ‘असं सगळ ऐकल्यानंतर मी फोन कट केला आणि तेव्हापासून आजपर्यंत मला दाक्षिणात्य सिनेविश्वातून फोन आलेला नाही. कॉम्प्रोमाइज फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, इतर इंडस्ट्रीमध्ये करावा लागतो. दाक्षिणात्य सिनेविश्वात संस्कृती, रितीरिवाज, कपड्यांचा सन्मान राखतात, पण पडद्यामागे कास्टिंग काऊच चालतं…’ असा धक्कादायक खुलासा टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत हिने केला आहे.

रतन आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.