Alok Nath | दारुच्या नशेत संस्कारी बापूंनी ओलांडली मर्यादा, आता कुठे आहेत आलोक नाथ? मोठी माहिती समोर

Alok Nath | कुठे आहेत संस्कारी बापू आलोक नाथ? दारुच्या नशेत त्यांनी ओलांडली होती सर्व मर्यादा, अनेक महिलांनी त्यांच्यावर केलेत लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप... आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्यांच्याबद्दल केलंय मोठं वक्तव्य...

Alok Nath | दारुच्या नशेत संस्कारी बापूंनी ओलांडली  मर्यादा, आता कुठे आहेत आलोक नाथ? मोठी माहिती समोर
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 9:33 AM

मुंबई | 1 मार्च 2024 : बॉलिवूडचे ‘संस्कारी बाऊजी’म्हणजे अभिनेते आलोक नाथ यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये उत्तम वडिलांची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पडद्यावर दाखवण्यात आलेल्या त्यांच्या भूमिका प्रचंड हीट ठरल्या. प्रोफेशनल आयुष्यात आलोक नाथ यांनी प्रचंड यश मिळवलं. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मीटू मोहिमे अंतर्गत अभिनेते नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यानंतर मीटू मोहिमे अंतर्गत अनेक क्षेत्रातील महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचा खुलासा केला.

आलेक नाथ यांच्यावर देखील अनेक महिलांनी गंभीर आरोप केले. ज्यामुळे आलोक नाथ यांना कठीण परिस्थितीचा सामना देखील करावा लागला. सांगायचं झालं तर, आलोक नाथ गेल्या काही वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहेत… आलोक नाथ कुठे आहेत आणि काय करतात असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे..

रिपोर्टनुसार, आलोक नाथ यांच्यावर निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. ज्यामुळे आलोक नाथ यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली होती.. एवढंच नाही तर 2018 मध्ये ‘संस्कारी बाऊजी’ यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला होता..

यासोबतच संध्या मृदुल आणि दीपिका अमीन यांनीही आलोक नाथ यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. याप्रकरणी आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला होता.. पण तेव्हापासून ‘संस्कारी बाऊजी’ झगमगत्या विश्वापासून दूर आहेत..

आलोक नाथ यांनी दारूच्या नशेत ओलांडल्या मर्यादा

रिपोर्टनुसार, एकदा आलोक थान शूटिंगसाठी त्यांच्या कास्टसोबत दुबईत जात होते. तेव्हा आलोक नाथ दारुच्या नशेत होते. नशेत असलेल्या आलोक नाथ यांनी पायलटच्या कानशिलात लगावली. याची किंमत आलोक नाथ यांच्यासोबत असलेल्या अनेकांना मोजावी लीगली. आलोक नाथ यांच्यासोबत अन्य कास्टला देखील विमानातून बाहेर काढण्यात आलं. तेव्हा देखील आलोक नाथ यांच्यावर टीका करण्यात आली.

प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आलोक नाथ यांच्याबद्दल मोठं वक्तव्य

अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने आलोक नाथ यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘आलोक नाथ उत्तम अभिनेते आहे. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना मला आनंद मिळाला. असा आनंद मला इतर कलाकारांसोबत काम करताना आला नाही. त्यांनी मला आदर दिला. त्यांनी मला कायम मुलीसारखी वागणूक दिली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.