Satish Kaushik | ‘माझी प्रकृती…’, मृत्यूआधी सतीश कौशिक यांनी कोणाला केलेला फोन, का झालं निधन? मोठी माहिती समोर

Satish Kaushik | होळी साजरी केल्यानंतर सतीश कौशक यांचा मृत्यू, निधनाच्या तीन तास पूर्वी त्यांनी कोणाला केलेला फोन, काय झालेली चर्चा? मोठी माहिती समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सतीश कौशिक यांच्या निधनाची चर्चा...

Satish Kaushik | 'माझी प्रकृती...', मृत्यूआधी सतीश कौशिक यांनी कोणाला केलेला फोन, का झालं निधन? मोठी माहिती समोर
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 12:43 PM

मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी 2023 मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. पण आजही त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. आता देखील सतीश कौशिक यांच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. मृत्यूच्या तीन तास आधी सतीश यांनी कोणाला फोन केला होता आणि दोघामध्ये काय बोलणं झालं. याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.

निधनाच्या तीन तास आधी सतीश यांनी दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाहीतर, खास मित्र आणि अभिनेता अनुपम खेर यांना फोन केला होता. खुद्द अनुपम खेर यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दोघांमध्ये काय बोलणं झालं सागितलं.

अनुपम खेर म्हणाले, ‘सतीश यांचा मला निधनाच्या तीन तास आधी फोन आला होता. माझी प्रकृती ठिक नाही असं ते म्हणत होते. त्यामुळे मी देखील त्यांना सांगितलं, सर्वात आधी रुग्णालयात जा… असं नका समजू की तुम्ही रुग्णालयात जात अहात, असं समजा की रिसॉर्टमध्ये जात आहा…’

हे सुद्धा वाचा

यावर सतीश कौशिक म्हणाले, ‘आता नको मी सकाळी जाईल… पुन्हा मी सतीश यांना सांगितलं रुग्णालयात जा आणि बेडवर आराम करा… नका समजू की तुम्ही रुग्णालयात आहात, असं समजा की हॉटेलमध्ये आराम करत आहात…’ सतीश कौशिक यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर आली होती.

सांगायचं झालं तर, सतीश कौशिक आणि अनुपम खेर चांगले मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांनी एकमेकांच्या चांगल्या – वाईट काळात एकमेकांना साथ दिली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र काम केलं. आता दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘कागज 2’ सिनेमा लवकर चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर त्यांची लेक वंशिका हिला देखील अनुपम खेर स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळतात. अनेक ठिकाणी वंशिका हिला अनुपम खेर यांच्यासोबत स्पॉट करण्यात येतं. वंशिका 10 वर्षांची असताना सतीश यांचं निधन झालं. त्यांनी लेकीसाठी खूप काही करण्याची इच्छा होती. पण निधनानंतर सतीश कौशिक यांचे सर्व स्वप्न अपूरे राहिले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.