Bigg Boss Marathi 5: टॉप 6 मधील सर्वात महागडा स्पर्धक कोण? सूरज चव्हाणचं मानधन इतकं कमी
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी 5' मधील सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक कोण?, पण सूरज याचं दिवसाचं मानधन जाणून म्हणाल..., टॉप 6 मधील कोणत्या स्पर्धकाला किती मानधन मिळतं घ्या जाणून...
Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी 5’ शोचा विजेता लवकरच घोषित होणार आहे. पण या शर्यतीत धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर देखील सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस मराठी 5’ ची चर्चा रंगली आहे. आता टॉप 6 स्पर्धकांबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. स्पर्धकांच्या मनधनाबद्दल देखील चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त मानधन निक्की तांबोळी हिचं आहे. तर सूरज चव्हाण याला मिळत असलेलं मानधन जाणून तुम्ही देखील अवाक् व्हाल.
सोशल मीडिया स्टार आणि निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिधनमधील सर्वात महागडी स्पर्धक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निक्की हिला दर आठवड्याला 3 लाख 75 हजार रुपये मानधन मिळतं. म्हणजे निक्की हिच्या बिग बॉसमधून होणाऱ्या दहा आठवड्यांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला जवळपास 37 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत.
View this post on Instagram
निक्की तांबोळी हिच्यानंतर ‘बिग बॉस मराठी 5’ सिझनमधील दुसरा सर्वात महागडा स्पर्धक अभिजीत सावंत आहे. अभिजीत सावंत याला आठवड्याला साडेतील लाख रुपयांचं मानधन मिळत आहे. बिग बॉसमधील सर्वात दमदार स्पर्धक म्हणून देखील अभिजीत सावंत आहे.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्या मानधनाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीला दर आठवड्याला 1 लाख रुपये मानधन मिळतं. तर सोशल मीडिया स्टार धनंजय पोवार याला आठवड्याला 60 हजार रुपये मानधन मिळतं. ‘बिग बॉस मराठी’ सिझनच्या सर्व स्पर्धकांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत सूरज चव्हाण याचं मानधन फार कमी आहे.
सूरज चव्हाण याच्या मानधनाबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस मराठी 5’ शोमध्ये प्रवेश केल्यानंतर सूरज चव्हाण याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सूरज याने फक्त 25 हजार रुपये आठवडा इतक्या मानधनावर घरात प्रवेश केला आहे. म्हणजे सूरजचं दिवसाचं मानधन फक्त 3 हजार 500 रुपये आहे.