Shah Rukh Khan च्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालकी हक्क नक्की कोणाकडे?
Shah Rukh Khan | किंग खान याने १३ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या 'मन्नत' बंगल्याची आजची किंमत थक्क करणारी; 'मन्नत' बंगल्याचा मालकी हक्क कोणकडे?
मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील किंग खान ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. गुरुवारी दहीहंडीच्या मुहूर्तावर अभिनेत्याने ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. किंग खान फक्त त्याच्या सिनेमांमुळे नाही तर, रॉयल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. शाहरुख खान याला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख मुंबईतील ‘मन्नत’ बंगल्यात कुटुंबासोबत राहतो. पण ‘मन्नत’ जुनं नाव काय होतं, बंगल्याचा मालकी हक्की नक्की कोणाकडे आहे? अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
शाहरुख खान याच्या ‘मन्नत’ बंगल्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने २००१ साली बंगली ‘बाई खोरशेद भानु संजना ट्रस्ट’कडून ‘विला विएना’ची खरेदी केला होता. तेव्हा किंग खान याने १३ कोटी रुपयांमध्ये बंगला विकत घेतला होता. आज किंग खान याच्या बंगल्याची किंमत तब्बल २०० कोटी रुपये आहे…
‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमलेली असते. शिवाय बंगल्याच्या बाहेर अनेक चाहते फोटो देखील काढत असतात. शाहरुख खान याने स्वतःच्या बंगल्याचं नाव पूर्वी ‘जन्नत’ ठेवलं होतं. पण नंतर अभिनेत्याने बंगल्याचं नाव बदललं आणि ‘मन्नत’ ठेवलं. किंग खान कुटुंबासोबत ‘मन्नत’मध्ये राहतो..
कोण आहे ‘मन्नत’ बंगल्याचे खरे मालक?
फार कमी लोकांना माहित असेल की शाहरुख खानच्या आधी मन्नतचा मालक किकू गांधी हे होते. तेव्हा हा बंगला ‘केकी मंझिल’ म्हणून ओळखला जायचा. जिथे गांधीजींचे आई-वडील राहत होते. अनेत पिढ्यांनी पाहिलेला हा बंगला नरिमन दुबाश यांना वारसा हक्क म्हणून मिळाला हेता. त्यानंतर किंग खान याने बंगला नरिमन दुबाश यांच्याकडून विकत घेतला…
बंगला समुद्र किनारी असल्यामुळे किंग खान याला बंगला प्रचंड आवडला. शाहरुख खानच्या या घरात तुम्हाला विंटेज, आधुनिक आणि स्टायलिश इंटीरियरचे पाहायला मिळेल. ‘मन्नत’ बंगल्याचं इंटीरियर किंग खान याची पत्नी गौरी खान हिने केलं आहे. बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.
शाहरुख खान याच्या बंगल्यात फक्त आलिशान बेडरूमच नाहीत तर त्यात बॉक्सिंग रिंग, टेनिस कोर्ट आणि मोठा स्विमिंग पूल देखील आहे. बंगल्यात एक स्टडीरूम आणि पुरस्कार ठेवण्यासाठी एक वेगळी जागा आहे. किंग खानचा आलिशान बंगला पत्नी गौरी खान हिने चार वर्षांच्या मेहनतीनंतर सुंदर तयार केलं आहे. गौरी अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर इंटेरिअरचे फोटो शेअर करत असते.