Weekend Spl | दीपिका-आलियाने रणथंभोरच्या सुट्टीचा प्लॅन केला? की हा योगायोगच होता?

रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी राजस्थानच्या रणथंभोरमध्ये 2021 चे स्वागत केले.

Weekend Spl | दीपिका-आलियाने रणथंभोरच्या सुट्टीचा प्लॅन केला? की हा योगायोगच होता?
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 5:10 PM

मुंबई : रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी राजस्थानच्या रणथंभोरमध्ये 2021 चे स्वागत केले. यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अगोदरच या सर्वांच्या बातम्यांबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते, यामुळे या सर्वांनासोबत बघून त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. (Who exactly planned the holiday in Rajasthan?)

मात्र, या सर्वांनीसोबत जाण्याचा रणथंभोरमधील प्लॅन ठरवला होता की, फक्त हा योगायोग आहे याची चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगत आहे. रणथंभोरमध्ये जाण्याची प्लॅन अगोदर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा होता. दीपिकाने कुटुंबीयांसोबत रणथंभोरला जाण्याचा प्लॅन आखला होता. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण, आई उज्ज्वला आणि बहीण अनिशासुद्धासोबत होते.

आलिया भट्टच्या एकाजवळच्या व्यक्तीने सांगितले की, गेल्या आठवड्यात जेव्हा आलियाने दीपिकाशी सुट्टीबद्दल बोलली होती तेंव्हा तिला समजले होते की, दीपिका सुट्टीसाठी रणथंभौरमध्ये जाणार आहे याचा अर्थ म्हणणे जे हे फक्त एक योगायोग होता. कारण आलिया, रणबीर कपूर, नीतू कपूरसह बहीण रिद्धिमासोबत सुट्टीवर आली होती. या ट्रिपमध्ये आलियाची आई सोनी राजदान देखीलसोबत होती.

रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘एचटी लीडरशिप समिट 2020’मध्ये बोलताना शंकर म्हणाले की, “ब्रह्मास्त्र” हा आतापर्यंत बनलेला भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. पण याबद्दल बोलताना उदय यांनी चित्रपटाचे बजेट जाहीर केले नाही.

जेव्हा उदय शंकर यांना, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाची एकूण किंमत 300 कोटी आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, त्यापेक्षाही जास्त आहे. असा कोणताही चित्रपट करण्यास वेळ लागतो. आणि अशा चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. या चित्रपटामध्ये खूपसे ग्राफिक्स वापरले आहे. करण जोहर हा चित्रपट ओटीटी रिलीजवर करण्याबाबत उत्सुक नसल्याचे म्हटले जात होते.

संबंधित बातम्या : 

नव्या वर्षात शाहरुख खानचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन, पठाण रिलीज होईल का?, चाहत्यांचा प्रश्न

ड्रग्ज केसमध्ये फसलेल्या अर्जुनसोबत कंगनाची पार्टी, चिडलेल्या प्रेक्षकांची चित्रपटावर बहिष्कार घालण्याची धमकी!

(Who exactly planned the holiday in Rajasthan?)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.