Baba Siddique | शाहरुख आणि सलमान खानही त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाहीत; कोण आहेत बाबा सिद्दीकी?

बॉलीवूडमध्ये असे काही लोक आहेत जे थेट फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नाहीत परंतु सर्व मोठ्या सुपरस्टार्सशी त्यांचे खूप जवळचे नाते आहे. असेच एक मोठे नाव आहे बाबा सिद्दीकी यांचं. ते बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिंटीच्या जवळचे आहेत. दबंग स्टार सलमान खान आणि बादशहा शाहरूख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात.

Baba Siddique | शाहरुख आणि सलमान खानही त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाहीत; कोण आहेत बाबा सिद्दीकी?
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 11:30 AM

मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : मुंबईत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं. आता बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचं ट्विट करून जाहीर केलं.त्यांचा बॉलिवूडशी घनिष्ट संबंध आहे.

बॉलीवूडमध्ये असे काही लोक आहेत जे थेट फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नाहीत परंतु सर्व मोठ्या सुपरस्टार्सशी त्यांचे खूप जवळचे नाते आहे. असेच एक मोठे नाव आहे बाबा सिद्दीकी यांचं. ते बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिंटीच्या जवळचे आहेत. दबंग स्टार सलमान खान आणि बादशहा शाहरूख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावतात. त्यांचं सलमान खानशी त्याचे जवळचं नातं का आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो.

इफ्तार पार्टीमुळे सदैव चर्चेत

रमजानच्या काळात इफ्तार पार्ट्या सुरू केल्यावर बाबा सिद्दीकी राष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. बाबांच्या इफ्तार पार्टीला केवळ राजकीय व्यक्तीच नाही तर बडे सिनेस्टार्सही हजर असतात. दरवर्षी त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी सलमान आणि शाहरुख व्यतिरिक्त, सोहेल खान, तमन्ना भाटिया, शहनाज गिल, शिल्पा शेट्टी, आयुष शर्मा आणि अर्पिता खान, सना खान, जय भानुशाली, रश्मी देसाई, करण सिंग ग्रोवर, कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह याच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतात.

सलमान -शाहरूखचा वाद मिटवून परत जोडली मैत्री

अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत बॉलिवूडचे दोन दिग्गज स्टार, सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात जोरदार भांडण झाले. यानंतर सलमान आणि शाहरुख अनेक वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते, त्यांच्यात दुरावा होता. त्यानंतर दोघेही सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत पोहोचले तेव्हा बाबा सिद्दीकी यांनीच पुढाकार घेऊन त्यांच्यात समेट घडवला. अनेक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले सलमान आणि शाहरुख या दोघांनी त्या पार्टीत एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर त्यांची मैत्री पूर्ववत झाली.

सलमानसोबत खास नातं

बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे खूप जवळचे नाते आहे. ते दोघंही अनेकदा एकत्र दिसतात. अनेक समाजसेवेच्या कामातही सलमान बाबांसोबत दिसतो. 2020 आणि 2021 मधील कोरोना लॉकडाऊन दरम्यान बाबाचा मुलगा झीशान सिद्दीकी याने सलमान खानच्या टीमसोबत केवळ भुकेल्या लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली नाही तर कोरोनाच्या लाटेत ऑक्सिजनशी झगडणाऱ्या लोकांना मदत केली.

प्रत्येक संकटात सलमानसोबत असतात बाबा सिद्दीकी

सलामन खआना हा केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर अनेक वादांमुळेही चर्चेत असतो. हिट अँड रन केस असो किंवा काळवीटाची शिकार, सलमानच्या अनेक कृत्यांनी खळबळ माजवली. याप्रकरणात सलमानला तुरूंगातही जावं लागलं होतं. जेव्हा जेव्हा सलमान अडचणीत सापडला, तेव्हा बाबा सिद्दीकी नेहमीच त्याच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याचे दिसले. त्याच्या प्रत्येक केसच्या सुनावणीदरम्यान बाबा सिद्दीकी कोर्टात हजर होते, किंवा ते सलमानच्या कुटुंबियांची मदत करताना दिसले.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....