ऐश्वर्या राय – कतरिना कैफ कोण आहे सर्वात बेस्ट, सलमान खान याने दिलेलं उत्तर चर्चेत
Salman Khan | सलमान खान याच्यासाठी कोण आहे सर्वात बेस्ट, ऐश्वर्या राय की कतरिना कैफ? भाईजान म्हणाला..., ऐश्वर्या आणि कतरिना कैफ यांच्यासोबत असलेलं भाईजानचं नातं चाहते आजही विसरु शकलेले नाहीत... सर्वत्र सलमान खान याच्या उत्तराची चर्चा...
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या आजही कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. सलमान खान याच्या नावाची चर्चा अनेक अभिनेत्रींसोबत झाली, पण ऐश्वर्या आणि कतरिना कैफ यांच्यासोबत असलेलं भाईजानचं नातं चाहते आजही विसरु शकलेले नाहीत. सलमान खान देखली दोघींबद्दल अनेक ठिकाणी बोलताना दिसतो. सांगायचं झालं तर, बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर यांच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सलमान याला ऐश्वर्या आणि कतरिना यांच्याबद्दल देखील विचारण्यात आलं होतं.
ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण कतरिना – सलमान यांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही. दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगत असताना करण याने शोमध्ये सलमान खान याला एक प्रश्न विचारला.
रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि कतरिना दोघींमध्ये सर्वात जास्ट स्टनिंग अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न करण याने भाईजानला विचारला. यावर सलमान खान याने ऐश्वर्या राय बच्चन हिच्यानंतर कतरिना हिचं नाव घेतलं. तेव्हा देखील अभिनेता तुफान चर्चेत आला होता.
View this post on Instagram
ऐश्वर्या – सलमान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘हम दिल जे चुके’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाची शूटिंग सुरु असतानाच दोघांमध्ये प्रेम बहरलं. पण सलमान आणि ऐश्वर्या यांचं नातं फार काळ टिकलं नाही. खेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर सलमान खान याने कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
कतरिना कैफ – विकी कौशल
View this post on Instagram
सलमान खान याच्यासोबत रंगत असलेल्या नात्याच्या चर्चांना पूर्णविराम लावल्यानंतर, कतरिना हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं. 9 डिसेंबर 2021 मध्ये विकी – कतरिना यांनी लग्न केलं. कतरिना देखील तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.