कोण आहे खान सरांची गर्लफ्रेंड ? ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये झाला उलगडा, पाहा मजेदार व्हीडीओ
या आठवड्यातील कपिल शर्मा यांच्या शोमध्ये सोशल मिडीयावर प्रसिद्ध असलेल्या एज्युकेटर खान सरांची मुलाखत आपल्या खास शैलीत कपिल शर्मा यांनी घेतली. यावेळी त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी प्रश्न विचारले गेले, काय बोलले खान सर पाहा..
मुंबई : इंटरनेटवर मुशाफीरी करणाऱ्यांना खान सरांचे नाव माहितीच आहे. त्यांच्या शिकवण्याच्या अनोख्या शैलीने ते इंटरनेटवर प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांचे फॅन फॉलोअरची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यांच्या युट्यूब चॅनलचे 1.9 कोटी सदस्य आहेत. तर तरूणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या आणि कोणताही अवघड विषय सोपा करून सांगणाऱ्या खान सरांची पर्सनल लाईफ प्रथमच लोकप्रिय लाफ्टर शो द कपिल शर्मा शोमधून प्रथमच समोर आली आहे.
बिहारच्या पाटणा शहरातील तरूणांचे आवडते खान सर आणि त्यांचे युट्युब चॅनल प्रचंड प्रसिद्ध आहे. पुस्तकी अभ्यास असो वा स्पर्धा परीक्षा वा राजकीय विषय यासंबंधीचे खान सरांचे हे अवघड विषय सोपे करून सांगण्याची खान सरांची शैली भन्नाटच आहे. त्यामुळे त्यांच्या यूट्युब चॅनलला भरपूर मागणी आहे. कॉमेडीयन कपिल शर्मा यांच्या शोमध्य या आठवड्यात पाहूणे म्हणून सोशल मिडीयाचे दिग्गज स्टार खान सर पोहचले. यावेळी खान सरांना त्यांनी बोलते करीत चांगलेच मनोरंजन केले. खान सर धर्म आणि लाईफस्टाईल याविषयी बोलले. बिझनेस एज्यूकेटर विवेक बिंद्रा यांच्यासोबत त्यांची मुलाखत कपिल यांनी घेतली.
कपिल शर्मा यांनी त्यांना मजेशीर प्रश्न विचारले. खान सरांनी त्यांची शिकविण्याची वेगळी पद्धत ते पर्सनल लाईफ सर्व बाबतीत मनमोकळी उत्तरे दिली. त्याचा व्हीडीओ खूपच व्हायरल झाला आहे. खान सर यांचे खरे नाव काय आहे ? असा पहिलाच गुगली त्यांना टाकला. त्यावर आपण नावाला जास्त महत्व देत नाही, आपण शिकविलेल्या मुलांनी देशाचे नाव रोशन करावे असे त्यांनी उत्तर दिले.
खान सरांना त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी कपिल यांनी काही प्रश्न केले. तुमचे लग्न झाले आहे का ? असा थेट सवालच त्यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी अजूनपर्यंत तरी झालेले नसल्याचे उत्तर दिले. मग काही प्रस्ताव आले आहेत का ? किंवा गर्लफ्रेंड आहे का ? असा सवाल कपिल यांनी विचारला. त्यावर खान सरांनी त्यांच्याकडे अजूनतरी कोणता प्रस्ताव कोणी आणला नसल्याचे सांगितले. तेव्हा विवेक बिंद्रा यांनी खान सर पर्सनल विषयावर उत्तरे कमी देतात असे बोलताच हास्याचे फवारे उडाले. पाटनाच्या खान सरांच्या नाव आणि धर्माच्या विषयी सोशल मिडीयावर खूप वाद निर्माण झाला होता. त्यांचे खरे नाव अमित कूमार असल्याचे म्हटले जाते. साल 2020 मध्ये खान सरांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी सोशल मिडीयावर खूपच अफवा पसरल्या होत्या. मात्र, यामुळे त्यांच्या फॅन फॉलॉईंगवर कोणताही परीणाम झालेला नाही.