Sana Khan | कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे सना खानचा पती मुफ्ती अनस; गरोदर पत्नीला ओढत नेल्याने चर्चेत

सना खान तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही सतत चर्चेत असते. अनसशी लग्न केल्यानंतरही तिला अत्यंत महागड्या रेस्टॉरंटमध्ये आणि परदेशात विविध ठिकाणी फिरताना पाहिलं गेलंय.

Sana Khan | कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे सना खानचा पती मुफ्ती अनस; गरोदर पत्नीला ओढत नेल्याने चर्चेत
Sana Khan and Anas SaiyadImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 3:22 PM

मुंबई : अभिनेत्री सना खानने इस्लाम धर्माचं कारण देत अभिनयविश्वाला कायमचा रामराम केला. त्यानंतर अचानक तिच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. बॉलिवूड इंडस्ट्री सोडत असल्याचं जाहीर केल्यानंतर महिनाभरातच तिने मुफ्ती अनस सय्यदशी निकाह केला. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीतील व्हायरल झालेला दोघांचा व्हिडीओ. गरोदर सनाचा हात पकडून तिचा पती अनस तिला भराभर चालत घेऊन जाताना या व्हिडीओत दिसतोय. प्रेग्नसीमध्ये सनाला पटापट चालता येत नसतानाही तो तिला तिथून खेचून घेऊन जाताना दिसतोय. यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोण आहे मुफ्ती अनस?

गुजरातमधील सूरत इथला राहणारा मुफ्ती अनस सय्यद हा एक धार्मिक नेता आणि इस्लामिक विद्वान आहे. सनाची एजाज खानच्या माध्यमातून मुफ्तीशी भेट करून देण्यात आली होती. मुफ्ती अनस हा बिझनेसमनसुद्धा आहे. निकाहनंतर त्याने सनाला एक्सक्लुसिव्ह डायमंड रिंग भेट म्हणून दिली होती.

हे सुद्धा वाचा

सना खानची संपत्ती

सना खान तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही सतत चर्चेत असते. अनसशी लग्न केल्यानंतरही तिला अत्यंत महागड्या रेस्टॉरंटमध्ये आणि परदेशात विविध ठिकाणी फिरताना पाहिलं गेलंय. सना खान चित्रपटसृष्टीत काम करत असताना एका चित्रपटासाठी जवळपास 50 लाख रुपये मानधन घ्यायची. तिच्या मुंबईतील फ्लॅटची किंमत सुमारे 7 कोटी रुपये इतकी आहे. सनाच्या नावावर आणखी एक फ्लॅट असून त्याची किंमत जवळपास चार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

मुफ्ती अनसची कमाई

अनस हा गुजरातमधील हिेरे व्यापारी आहे. त्याचा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर परदेशातही असल्याचं म्हटलं जातं. त्यातून त्याची कमाई कोट्यवधींमध्ये होते. मुफ्ती अनससुद्धा सनाप्रमाणेच आलिशान लाइफस्टाइल पसंत करतो. भारतासोबतच परदेशातही त्याची काही संपत्ती आहे. गुजरातमध्ये त्याचा जवळपास 20 कोटी रुपयांचा मोठा बंगला आहे. त्याची भारताबाहेरील संपत्ती ही 50 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.

View this post on Instagram

A post shared by AnasSaiyad (@anas_saiyad20)

सना खानने इंडस्ट्री का सोडली?

“माझ्याकडे नाव, प्रसिद्धी, पैसा हे सगळं होतं. मी काहीही करू शकले असते आणि मला हवं तसं राहू शकले असते. परंतु एक गोष्ट जी हरवली होती, ती म्हणजे मनाची शांती. माझ्याकडे सर्व काही असूनही मी आनंदी का नाही, असा प्रश्न मला पडायचा. मी नैराश्यात गेले होते,” असं तिने सांगितलं होतं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.