सारा अली खान की सारा तेंडुलकर… कोण आहे शुभमन गिल याची गर्लफ्रेंड?
'त्या' व्हिडीओनंतर शुभमन गिल - सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनशिपची चर्चा; क्रिकेटर शुभमन याच्या आयुष्यात कोणती सारा? नक्की काय आहे सत्य?
Shubhman Gill Viral Post : अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगत असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शुभमन गिल सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिच्यासोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगत आहे. नुकताच शुभमन गिल याच्या सामन्यादरम्यान क्रिकेटरचे चाहते सारा-सारा म्हणून ओरडू लागले. ज्यानंतर शुभमन याने देखल चाहत्यांना प्रतिसाद दिला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट पूर्णपणे फेक आहे. पण पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
न्यूझीलँडमध्ये झालेल्या सामन्यानंतर शुभमन तुफान चर्चेत आहे. जेव्हा शुभनम गिल याने शतक पूर्ण केलं तेव्हा चाहते सारा-सारा म्हणून ओरडू लागले. ज्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये शुभमन आणि सारा तेंडुलकर साखरपुडा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण हे पूर्णपणे फेक आहे.
BREAKING: Sachin Tendulkar announces daughter Sara’s engagement with #ShubmanGill pic.twitter.com/tzvF6sWWD9
— Harsh (@hrsyadv) January 18, 2023
काही दिवसांपूर्वी शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खान हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एका मुलाखतीमध्ये शुभमन याला आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शुभमन याने सारा अली खान हिचं नाव घेतलं. एवढंच नाही तर साराला डेट करत आहेस का? असा प्रश्न देखील क्रिकेटरला विचारण्यात आला.
या प्रश्नावर शुभमन म्हणाला, ‘शायद हा शायद ना…’ या उत्तरानंतर शुभमन तुफान चर्चेत आला. शिवाय सारा देखील शुभमन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. पण साराने यावर मौन बाळगलं आहे. त्यामुळे शुभमन सारा अली खान हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
View this post on Instagram
दरम्यान सारा खान आणि शुभमन गिल यांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांना एकत्र फिरताना स्पॉट करण्यात आलं. शिवाय दिल्ली येथील एका हॉटेलच्या बाहेर पडताना दोघांना एकत्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं.