21 वर्षीय मुलाचा पिता अरबाज खान दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे होणारी पत्नी?

अभिनेता अरबाज खान येत्या 24 डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला मोजके कुटुंबीय आणि पाहुणे उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी तो लग्न करणार असल्याचं कळतंय. शुरा खानविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

21 वर्षीय मुलाचा पिता अरबाज खान दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे होणारी पत्नी?
Arbaaz KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 12:43 PM

मुंबई : 22 डिसेंबर 2023 | अभिनेता आणि निर्माता अरबाज खान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 24 डिसेंबर रोजी अरबाज दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. मेकअप आर्टिस्ट शुरा खानला तो डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांनी उर्वरित आयुष्य एकमेकांसोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 56 वर्षीय अरबाज हा गेल्या काही वर्षांपासून मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने एका मुलाखतीत अरबाजशी ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता अरबाजच्या लग्नाची बातमी समोर येत आहे. अरबाज कोणाशी लग्न करणार आहे, ती मेकअप आर्टिस्ट नेमकी कोण आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

कोण आहे शुरा खान?

शुरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असून तिचे 13.2 हजार फॉलोअर्स आहेत. शुराने अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलंय. अरबाज आणि शुराची पहिली भेट ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली.

56 वर्षीय अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. मात्र लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर अरबाज आणि मलायकाने 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2017 मध्ये दोघं विभक्त झाले. 1998 मध्ये अरबाज आणि मलायकाने लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. अरबाज आणि मलायाकाचा मुलगा अरहान खान हा आता 21 वर्षांचा आहे.

हे सुद्धा वाचा

मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज हा मॉडेल जॉर्जियाला डेट करू लागला होता. तर मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय. जॉर्जियाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजच्या ब्रेकअपचा खुलासा केला होता. “तो माझा सर्वोत्कृष्ट मित्र आहे आणि माझ्या मनात त्याच्याविषयी नेहमीच भावना असतील. मलायकासोबतचं त्याचं नातं कधीच आमच्या नात्यात अडथळा ठरला नव्हता. पण अरबाजची एक्स गर्लफ्रेंड म्हणून माझी ओळख करून दिली तर मला खूप वाईट वाटतं. मला अपमानित केल्यासारखं वाटतं”, असं जॉर्जिया म्हणाली होती.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...