सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या नवऱ्याकडे नाही काम! सासरे आहेत गडगंज श्रीमंत
Sonakshi Sinha Father in Law | कसं आहे सोनाक्षी सिन्हा हिचं सासर? होणाऱ्या नवऱ्याकडे नाही कोणतं काम, पण अभिनेत्रीचे सासरे आहेत गडगंज श्रीमंत..., काय करतात अभिनेत्रीचे सासरे? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची चर्चा...
”थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है…’ असं म्हणत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या सात वर्षांपासून अभिनेता झहीर इक्बाल याला डेट करत आहे. एवढंच नाही तर, गेल्या एक वर्षापासून दोघे लिव्हइन-रिलेशनशिपमध्ये राहात आहेत… असं देखील सांगितलं जात आहे. सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीर यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री इक्बाल कुटुंबियांची सून होणार असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीच्या सासरची देखील चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झहीर – सोनाक्षी 23 जून रोजी रजिस्टर्ड मॅरिज करणार आहे. झहीर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, झहीर अभिनेता आणि मॉडलिंग देखील करतो. पण झहीर याच्याकडे कोणताच अपकमिंग प्रोजेक्ट नाही. शिवाय कोणत्या सिनेमासाठी देखील झहीर याचं नाव पुढे नाही. शिवाय झहीर याच्याकडे फक्त 1 ते 2 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे. पण झहीर याचे वडील गडगंज श्रीमंत आहेत.
झहीर याचे वडील इक्बाल रतनसी ज्वेलर्स आणि व्यापारी आहेत. सोनाक्षी हिच्या होणाऱ्या सासऱ्यांकडे गडगंज संपत्ती आहे. शिवाय इक्बाल कुटुंब रॉयल आयुष्य जगतं. बिल्डर व्यापारामध्ये इक्बाल कुटुंबाचं नाव आहे. शिवाय अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील इक्बाल कुटुंबियांचे खास संबंध आहेत.
झहीरची आई गृहिणी आहे, त्याची बहीण एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे आणि त्याचा धाकटा भाऊ कंप्यूटर इंजीनियर म्हणून काम करतो. सध्या सर्वत्र झहीर याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील झहीर कायम कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
झहीर इक्बाल याची संपत्ती…
झहीर इक्बाल यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या नेटवर्थमध्ये फार मोठं अंतर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी सिन्हा हिच्याकडे जवळपास 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे. शिवाय अभिनेत्रीच्या गॅरेजमध्ये देखील महागड्या गाड्या आहे. एका सिनेमासाठी सोनाक्षी 3 कोटी रुपये मानधन घेते. जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सोनाक्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करते.
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नोटबूक’ सिनेमातून झहीर याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मीडिया रिपोर्टनुसार, झहीर याच्याकडे 1 ते 2 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सिनेमांव्यतिरिक्त, झहीर ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून देखील कमाई करतो. झहीर याच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे मर्सिडीज बेंझ एम-क्लास सारखी आलिशान कार आहे.