Bigg Boss 17 मुळे ‘हे’ सेलिब्रिटी मालामाल; एका आठवड्यासाठी घेतात मोठी रक्कम

Bigg Boss 17 | 'बिग बॉस 17' मधील काही स्पर्धकांसाठी निर्मांत्यांना मोजावी लागते फार मोठी रक्कम; एका आठवड्यातच 'हे' सेलिब्रिटी मालामाल... सध्या सर्वत्र बिग बॉसची चर्चा... वाद, भांडण, कर्तव्य आणि सलमान खान याचा निर्णय... चाहत्यांची उत्सुकता शिगेला...

Bigg Boss 17 मुळे 'हे' सेलिब्रिटी मालामाल; एका आठवड्यासाठी घेतात मोठी रक्कम
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 10:07 AM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : वाद-विवाद, घरातील कर्तव्य, स्वयंपाकावरून भांडण, खोल्यांसाठी दमदार वाद.. या सर्व गोष्टी नसतील तर, ‘बिग बॉस’ या शोला काहीही मजा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. वादग्रस्त शो पाहाणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता ‘बिग बॉस 17’ ची सुरुवात झाली झाली आहे. ‘बिग बॉस 17’मध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि युट्यूबर स्पर्धक म्हणून आहेत. ‘बिग बॉस 17’ शोच्या पहिल्याच दिवशी घरात अनेकांचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस 17’ मध्ये स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 17’ शोची चर्चा सुरु आहे. शोमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांमधील भांडणं पाहायला मिळत आहेत. पण शोसाठी स्पर्धांनी घेतलेल्या मानधानाबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. तर जाणून घेवू ‘बिग बॉस 17’ शोसाठी कोणाला अधिक मानधन मिळतं.

‘बिग बॉस 17’ मध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलप्लची एन्ट्री झाली आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या-नील भट्ट आणि अंकिता लोखंडे-विक्की जैन आहेत. सांगायचं झालं तर, शोच्या सुरुवातीपासूनच अंकिता लोखंडे चर्चेत आहे. अंकिता शोमध्ये २०० कपडे घेवून येणार असल्याची चर्चा रंगली होती. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याची माहिती आता समोर आली आहे.

कोण आहे सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक?

‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे प्रसिद्ध झोतात आलेल्या अंकिता लोखंडे हिने अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खानसमोर खुलासा केला का, ती तिचा पती विकी जैनमुळे हा शो करत आहे. विक्की जैनला ‘बिग बॉस 17’ मध्ये यायचं होतं. मिळत असलेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस 17’ सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धांमध्ये अंकिता आणि विकी पहिल्या स्थानावर आहेत.

अंकिता लोखंडे-विकी जैन ‘बिग बॉस 17’ मध्ये एका आठवड्यासाठी 12 लाख रुपये आकारत आहे. अभिनेत्रीला याआधीही अनेक वेळा बिग बॉसची ऑफर देण्यात आली होती, तरीही तिने हा शो नाकारला होता. आता पती विकी जैन याच्यामुळे अभिनेत्री शोसाठी होकार दिला आहे.

अंकिता लोखंडे-विकी जैन हे शोमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहेत, पण शोमध्ये एकटा एन्ट्री घेणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी याचं मानधन देखील फार मोठं आहे. मुनव्वर फारूकी शोमध्ये एका आठवड्यालाठी तब्बल 7 ते 8 लाख रुपये घेतो. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस 17’ शोची चर्चा आहे. त्यामुळे शोमध्ये पुढे काय होतं पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.