रेखा यांच्या आयुष्यातील मिस्ट्री मॅन कोण? अर्चनाच्या ‘त्या’ प्रश्नावर रेखा हैराण
Rekha Personal Life: रेखा पुन्हा खासगी आयुष्यामुळे चर्चेत, कोण आहे रेखा यांच्या आयुष्यातील 'मिस्ट्री मॅन'? अर्चनाच्या 'त्या' प्रश्नावर रेखा हैराण, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...
Rekha Personal Life: नुकताच अभिनेत्री रेखा विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये आल्या होत्या. शोमध्ये रेखा यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. नुकताच एपिसोड नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. दरम्यान, अर्चना पुरन सिंग हिने रेखा यांच्यासोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटो पोस्ट करत अर्चना हिने तिच्या आणि रेखा यांच्या पहिल्या भेटीबद्दल आणि त्यांच्या आयुष्यातील ‘मिस्ट्री मॅन’बद्दल देखील खुलासा केला.
अर्चना पोस्टमध्ये म्हणाली, ‘जेव्हा मी रेखा यांचा ‘सावन भादों’ सिनेमा पाहिला… मी मुंबईला जाण्याची फारशी आशा नसलेली लहान शहरातील मुलगी होते… आणि रेखाजींना प्रत्यक्ष भेटण्याची आशाही नव्हती. आणि त्यानंतर अनेक वर्षांनी मी त्यांच्यासोबत ‘लडाई’ सिनेमामध्ये काम केलं.
‘रेखा यांनी सिनेमाच्या सेटवर मला मेकअप रुममध्ये बोलावलं. त्यांनी मला मेकअप आणि नकली पापण्या लावायला शिकवलं. नकली पापण्या म्हणजे आयलॅशेज… आयलॅशेजचं बॉलिवूडमधील ट्रेन्डचं श्रेय देखील रेखा यांना जातं…मी आणि रेखा फिल्म सीटीच्या लॉनमध्ये प्रचंड गप्पा मारायचो…’
View this post on Instagram
‘मला आजही लक्षात आहे त्या कायम एका व्यक्ती बद्दल बोलत असायच्या. मी त्यांना त्या व्यक्तीबद्दल विचारलं देखील. पण त्या म्हणाल्या त्या व्यक्तीबद्दल तुला काहीही माहिती नाही… रेखा खरंच कमाल आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेणे खूप आनंददायक आहे.’ असं देखील अर्चना म्हणाली.
रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटींची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत रेखा यांचं लग्न झालं नाही. अखेर रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांनी स्वतःला संपवलं.
रेखा आणि अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन विवाहित असताना रेखा सोबत त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. रेखा यांनी अनेकदा बिग बी यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं नाही. आज रेखा नकळत अनिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसतात.