कोण आहे नरगिस फाखरीची बहीण आलिया? जिने एक्स-बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं…

Nargis Fakhri Sister Aliya Fakhri: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नरगिस फाखरीची बहीण वादाच्या भोवऱ्यात, कोण आहे अभिनेत्री बहीण आलिया? जिने 35 वर्षिय एक्स-बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नरगिस फाखरी हिच्या बहिणीची चर्चा...

कोण आहे नरगिस फाखरीची बहीण आलिया? जिने एक्स-बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं...
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 9:24 AM

Nargis Fakhri Sister Aliya Fakhri: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची को-स्टार अभिनेत्री नरगिस फाखरी अचनाक चर्चेतआ आली आहे. नरगिस तिच्या आगामी सिनेमामुळे किंवा इतर कोणत्या कारणमुळे नाही तर, बहीण आलिया फाखरी हिच्यामुळे चर्चेत आली आहे. नरगिस हिची बहीण आलिया हिने एक्स-बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं आहे. ज्यामुळे न्यूयॉर्क पोलिसांनी अभिनेत्रीच्या बहिणीला अटक केली आहे. अद्याप आलिया फाखरी हिच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाही. पण सध्या ती रिमांडवर असून संबंधित खटल्याची सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे. अशात जाणून घेऊ कोण आहे नरगिस फाखरीची बहीण आलिया फाखरी?

नरगिस फाखरी हिची बहीण आलिया न्यूयॉर्क येखील क्वींस याठिकाणी राहते. मिळालेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय आलिया हिने 35 वर्षिय एडवर्ड जॅकब्स नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण गेल्या काही वर्षांपूर्वी दोघे विभक्त झाले. आलिया आणि नरगिस यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, दोघी लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यांचे वडील मोहम्मद फाखरी एक पाकिस्तानी होते आणि त्यांची आई मेरी चेक रिपब्लिकची आहे.

आलियाला ड्रग्ज आहे व्यसन

आई – वडील विभक्त झाल्यानंतर काही दिवसांनंतर नरगिस आणि आलिया यांच्या वडिलांचं निधन झालं. आलियावर नुकताच झालेल्या आरोपांबद्दल तिच्या आईला विचारण्यात आलं आहे. आलियाच्या आई म्हणाल्या, ‘विश्वास बसत नाहीये आलियाने कोणाची हत्या केली आहे. आलिया अशी बिलकूल नव्हती. ती कायम सर्वांची काळजी घ्यायची… सर्वांचा मदत करायची…’, त्यांनी खुलासा केला की आलियाला काही काळापासून दातांच्या समस्येनं ग्रासलं होतं. त्यानंतर तिला ओपिओइड्सचं (ड्रग्ज) व्यसन लागले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आलियावरील आरोपांनुसार, 2 नोव्हेंबरला आलिया जेकब्सच्या गॅरेजमध्ये पोहोचली, जिथे तिने आज तुम्ही सर्व मरणार आहात, अशी ओरडत होती… धमकी देत असताना एका शेजाऱ्याने पाहिलं होतं. शेजारच्या व्यक्तीने कोर्टात सांगितलं, धमकी दिल्यानंतर आलियाने गॅरेजला आग लावली. जेकब्सच्या आईने कोर्टात सांगितले की, जेकब्स आणि आलियाचं नातं वर्षभरापूर्वीच संपलं होतं, मात्र आलियाला ते सहन होत नव्हतं. आतापर्यंत या प्रकरणी नर्गिसचे कोणतेही वक्तव्य समोर आलेलं नाही. याप्रकरणी आता पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.