वयाच्या 48 व्या वर्षी कोणासोबत लग्न करणार सुष्मिता सेन? अनेक सेलिब्रिटींना केलंय डेट
अनेक सेलिब्रिटींसोबत सुष्मिता सेन हिच्या नावाची चर्चा, 16 वर्ष लहान व्यक्तीला अभिनेत्री करतेय डेट, पण कोणासोबत करणार लग्न? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिता सेन हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्री थाटणार संसार...
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. सध्या अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा सुष्मिता हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंड्सच्या यादीत अभिनेता रणदीप हुडा याच्यापासून उद्योजक ललित मोदी याच्या नावाचा देखील समावेश आहे.
सध्या सुष्मिता स्वतःपेक्षा 16 वर्ष लहाना रोहमन शॉल याला डेट करत आहे. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुष्मिता हिने तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता हिने संसार थाटण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिता हिची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुष्मिता हिला ब्रेकअप्स झाल्यानंतर स्वतःला कशा प्रकारे सावरते… असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझं आयुष्य एका खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. आयुष्यात तुम्ही जे काही निर्णय घेता… ते निर्णय वेदनादायी असू शकतात. पण आयुष्यातील प्रत्येक निर्णय काही न काही तरी आपल्याला शिकवून जातो…’ असं अभिनेत्री म्हणाली.
लग्नावर देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आई – वडील किंवा समाजाचा दबाव असल्यामुळे लग्न करतोय… असं कधीही होऊ शकत नाही. मला देखील योग्य व्यक्ती भेटला तर मी नक्की लग्न करेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, गेल्या कित्येक वर्षांपासून सुष्मिता आणि रोहमन एकमेकांना डेट करत आहे.
दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं आहे. शिवाय अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील रोहमन याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असते. पण अभिनेत्री लग्न केलं तर, कोणासोबत करेल यावर मौन बाळगलं आहे. त्यामुळे वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता कोणासोबत लग्न करेल? हे येणारा काळच सांगेल..
सुष्मिता सेन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील सुष्मिता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते.