अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सत्य आलं समोर

अभिषेक-करिश्माचं लग्न का होऊ शकलं नाही? दिग्दर्शकाने सांगितलं कारण

अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सत्य आलं समोर
करिश्मा कपूर अभिषेक बच्चनImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 11:56 AM

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत बऱ्याच कलाकारांचे अफेअर्स चर्चेत राहिले आहेत. यातील काही लव्ह-स्टोरी लग्नापर्यंत पोहोचल्या, तर काही त्याआधीच संपल्या. बॉलिवूडमध्ये एक जोडी अशीही होती, ज्यांनी साखरपुडा केला, मात्र लग्नाआधीच त्यांचं नातं संपलं. अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची ही जोडी होती. या दोघांचं अफेअर सर्वश्रुत होतं. त्यांचा साखरपुडा पार पडलेला आणि दोघं लग्नसुद्धा करणार होते. मात्र नंतर असं काही घडलं की कपूर आणि बच्चन कुटुंबीयांमधील हे नातंच तुटलं. या घटनेच्या कित्येक वर्षांनंतरही अभिषेक-करिश्माचा साखरपुडा का मोडला, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी अखेर एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या तुटलेल्या नात्याविषयी खुलासा केला. अभिषेक आणि करिश्माने 2000 मध्ये जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या या दोघांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र त्यानंतर त्याचं नातं तुटलं. सुनील दर्शन यांनी 2000 मध्ये ‘हां मैने भी प्यार किया’ या चित्रपटासाठी दोघांसोबत काम केलं होतं.

हे सुद्धा वाचा

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुनील यांना अभिषेक-करिश्मामधली जवळीक स्पष्ट दिसू लागली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि त्याचसोबत अभिषेक-करिश्माचं नातंसुद्धा संपुष्टात आलं.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन म्हणाले, “अभिषेक-करिश्माच्या नात्याची अफवा नव्हती, ते सत्य होतं. ते दोघं लग्न करणार होते. मी स्वत: त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होतो.” या दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही, याची चुणूक सुनील दर्शन यांना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच लागली होती.

“अभिषेक आणि करिश्मा हे सेटवर नेहमीच एकमेकांशी भांडायचे. या दोघांची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ अशी नव्हती. सतत त्यांच्यात भांडणं व्हायची. कदाचित काही लोकांचं नातं असंच असतं. मला नेहमीच प्रश्न पडायचा की खरंच हे दोघं एकमेकांसाठी बनले आहेत का? अभिषेक आणि करिश्मा दोघं स्वभावाने चांगले आहेत. पण दोघांच्या नशिबात एकत्र राहणं नव्हतं,” असं ते म्हणाले.

करिश्मा आणि अभिषेक सध्या आपापल्या आयुष्यात व्यग्र आहेत. अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर करिश्माने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं होतं. मात्र 2016 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मा आणि संजय यांना दोन मुलं आहेत.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.