का तुटली ऐश्वर्या राय – राणी मुखर्जीची पक्की मैत्री? नंतर मैत्रिणीच्याच एक्स बॉयफ्रेंडशी केलं लग्न
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांची एकेकाळी खूप चांगली मैत्री होती. मात्र एका कारणामुळे यांच्या मैत्रीत कटुता निर्माण झाली आणि आजवर तो दुरावा मिटला नाही. शाहरुख खानच्या 'चलते चलते' या चित्रपटामुळे हा वाद झाला होता.
बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये अनेकदा कॅट-फाइट झाल्याच्या चर्चा समोर येतात. एकेकाळी एकमेकांच्या जिवलग मैत्रिणी असणाऱ्या अभिनेत्रींमध्येही वादाची ठिणगी उडते आणि त्यानंतर त्या कधीच एकमेकींसमोर येत नाहीत. असंच काहीसं अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांच्यात घडलं होतं. याविषयी खुद्द राणीने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सांगितलं होतं. राणीने सांगितलं की तिच्या मनात काहीच कटुता नाही, पण ऐश्वर्याकडून बोलणं बंद झालं होतं. कुठे ना कुठे तरी तिच्या मनात काहीतरी असेल, म्हणून तिने बोलणं बंद केलं असावं, असं राणी म्हणाली होती. राणी आणि ऐश्वर्या यांची मैत्री ‘चलते चलते’ या चित्रपटामुळे तुटल्याचं म्हटलं जातं.
2003 मध्ये राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘चलते चलते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी पहिली निवड ऐश्वर्याची करण्यात आली होती. त्याचवेळी ऐश्वर्याचं अभिनेता सलमान खानसोबत ब्रेकअप झालं होतं. सलमान अनेकदा या चित्रपटाच्या सेटवर येऊन गोंधळ निर्माण करायचा. शाहरुख याच गोष्टीने खूप वैतागला होता. अखेर ऐश्वर्याच्या हातून हा चित्रपट गेला आणि राणीला ती संधी मिळाली. नंतर शाहरुखने या गोष्टीची खंतही व्यक्त केली होती. तर ऐश्वर्याने सांगितलं होतं की शाहरुखच्या पाच चित्रपटांमधून तिला काढून टाकण्यात आलं होतं. ‘चलते चलते’ या चित्रपटात जेव्हा राणी मुखर्जीची निवड झाली, तेव्हा ऐश्वर्याला त्याबद्दल माहिती नव्हती. याच गोष्टीवरून ती नाराज झाली आणि तिने राणीसोबत बोलणंच सोडून दिलं होतं.
View this post on Instagram
अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचं रिलेशनशिप इंडस्ट्रीत सर्वांनाच माहीत होतं. ‘बंटी और बबली’ या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ते लग्नही करणार होते. मात्र जया बच्चन यांना राणी मुखर्जी पसंत नव्हती, असं म्हटलं जातं. कोणत्याही परिस्थितीत त्यांना अभिषेकचं लग्न राणीशी करून द्यायचं नव्हतं. यामागचं कारण ‘ब्लॅक’ हा चित्रपट असल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटातील राणीच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. पण त्यात तिचं अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक किसिंग सीनसुद्धा होता. यावरून जया बच्चन खूप भडकल्या होत्या आणि त्यांना सून म्हणून राणीचा स्वीकार नव्हता. त्यामुळे राणी आणि अभिषेकचं ब्रेकअप झालं.
‘गुरू’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकांच्या जवळ आले. ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 2007 मध्ये त्यांनी लग्न केलं,