Bigg Boss 16 | TRP क्वीन असूनही ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यापासून अर्चना गौतम दूर का?

बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा टीआरपी आणण्यात अर्चना गौतमचा मोठा वाटा आहे. मात्र असं असूनही फिनाले जवळ आला असताना ती विजेतेपदापासून बरीच दूर असल्याचं दिसतंय.

Bigg Boss 16 | TRP क्वीन असूनही 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकण्यापासून अर्चना गौतम दूर का?
Archana GautamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 4:56 PM

मुंबई: बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात ग्रँड फिनाले वीक सुरू आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर विजेता कोण ठरणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा टीआरपी आणण्यात अर्चना गौतमचा मोठा वाटा आहे. मात्र असं असूनही फिनाले जवळ आला असताना ती विजेतेपदापासून बरीच दूर असल्याचं दिसतंय. संपूर्ण सिझनमध्ये अर्चना विविध कारणांमुळे चर्चेत होती. मात्र तिची खेळीच आता तिच्याविरोधात उलटताना दिसत आहे.

‘कलर्स’चा चेहरा नसल्याने फटका?

अनेकदा पाहिलं गेलंय की कलर्सचाच चेहरा बिग बॉसचा विजेता ठरलाय. रुबिना दिलैक, दीपिका कक्कर, सिद्धार्थ शुक्ला.. यांनी कलर्स वाहिनीसोबत काम केलं होतं आणि बिग बॉसचे विजेतेसुद्धा ठरले होते. यावेळीसुद्धा प्रियांका चहर चौधरी ही कलर्सचा चेहरा आहे, त्यामुळे तिच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अर्चना ही कलर्सचा चेहरासुद्धा नाही आणि तिने कोणत्या मालिकेतही काम केलं नाही. त्यातच ती सिझनमध्ये एकदा बाहेरसुद्धा गेली होती. गौहर खानला सोडून असा कोणताही स्पर्धक आजपर्यंत विजेता ठरला नाही जो बिग बॉसच्या घराबाहेर जाऊन परत आला असेल.

अर्चनाची इमेज

अर्चनाला एंटरटेन्मेंट क्वीन म्हटलं जातं. या सिझनमध्ये तिने तिच्या कॉमेडी आणि अतरंगी कारनाम्यांमुळे प्रेक्षकांना खूप हसवलं. मात्र या सर्वांची दुसरी बाजूसुद्धा आहे. एंटरटेन्मेट क्वीनसोबतच अर्चनाला ‘वॅम्प’ असंही म्हटलं गेलंय. अनेकांना तिचा आवाज, तिचं बोलणं आणि तिचे शब्द आवडत नाहीत. कारण रागाच्या भरात असलेली अर्चना प्रेक्षकांनाही प्रचंड खटकते. त्यामुळे तिची नकारात्मक इमेज तयार झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अर्चनाची वादग्रस्त विधानं

अर्चनाला अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे सूत्रसंचालक सलमान खानचीही बोलणी खावी लागली आहे. सलमान शिवाय करण जोहर आणि फराह खान यांनीसुद्धा अर्चनाची चांगलीच शाळा घेतली होती. सलमानने तर अर्चनाला थेट घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती.

बिग बॉसचा घरात मित्रच बनला नाही

बिग बॉस हा नात्यांचा शो आहे. आपलं व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा शो आहे. या शोमध्ये अर्चना नेहमीच चर्चेत राहिली. मात्र जेव्हा नाती जपण्याची वेळ आली, तेव्हा अर्चनाला मोठा फटका बसला आहे. अर्चनाने ज्यांच्यासोबत आधी मैत्री केली, त्यांनाच नंतर तिने खरंखोटं सुनावलं. मग ती प्रियांका असो किंवा सौंदर्या. सौंदर्यासोबत अर्चनाची अनेकदा भांडणं झाली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.