‘कोई मिल गया’ सिनेमानंतर रजत बेदीने अचानक का सोडलं बॉलिवूड आणि देश?

रजत बेदी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. पण तो या इंडस्ट्रीमधून मध्येच असा गायब झाला रकी तो कुठे आहे आणि काय करतोय हे कोणालाच माहित नव्हते. यशाच्या शिखरावर असताना त्याने इंडस्ट्री सोडली. त्यानंतर तो देश सोडून गेला. मग जेव्हा त्याला आपला देश आणि कॅमेऱ्यांच्या चकचकीत जगाची आठवण झाली तेव्हा तो परतला, पण ते यश मिळाले नाही.

'कोई मिल गया' सिनेमानंतर रजत बेदीने अचानक का सोडलं बॉलिवूड आणि देश?
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 7:52 PM

कोई मिल गया या सिनेमातून हृतिक रोशनने भरपूर प्रसिद्धी मिळवली. या सिनेमात त्याची भूमिका लोकांना खूप आवडली. पण या सिनेमात आणखी एक अभिनेता होता. जो विलनच्या भूमिकेत होता. ज्याची तुलना कधीतरी अक्षय कुमार सारख्या अभिनेत्यासोबत केली जायची.  तो इंडस्ट्रीत आल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पण तो इंडस्ट्रीत लांबलचक इनिंग खेळू शकला नाही. हा अभिनेता हळूहळू अज्ञाताच्या अंधारात हरवून गेला. एक दिवस त्याने बॉलिवूडचा कायमचा निरोप घेतला. प्रसिद्ध अभिनेता रजत बेदी अचानक कुठे गायब झाला कोणालाच कळाले नाही. तो आता कुठे आहे, तो काय करतो आणि त्याने या झगमगत्या जगाचा निरोप का घेतला हे आपण जाणून घेणार आहोत.

रजत बेदी याचा जन्म 1 जानेवारी 1970 रोजी मुंबईत झाला. रजतकडे भारताचे नाही तर कॅनडाचे नागरिकत्व आहे. सध्या रजन हा 54 वर्षाचा आहे. अभिनेता असण्यासोबतच रजत बेदी हा निर्माता देखील आहे. 2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘कोई…मिल गया’ मुळे तो घराघरात नावारूपाला आला. पण नंतर त्याला कोणीही पाहिले नाही. रजतचे वडील नरेंद्र बेदी हे देखील चित्रपट निर्माते होते. त्यांचे आजोबा राजेंद्र बेदी लेखक होते आणि ते मानेक बेदी यांचे भाऊ आहेत.

रजतने 1990 मध्ये अभिनयाला सुरुवात केली होती. त्याने 1998 मध्ये ‘दोबारा’ आणि 1995 मध्ये ‘करण अर्जुन’ सारख्या चित्रपटात काम केले. रजत ॲक्शन, कॉमेडी आणि ड्रामाही अशा वेगवेगळ्या भूमिका करत असे. तो फिटनेसचा वेडा होता. खूप घाम गाळायचा आणि मजबूत शरीर राखायचा.

रजतने हिंदीशिवाय साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले. कन्नड आणि तेलगू व्यतिरिक्त तो पंजाबी चित्रपटांमध्येही दिसला होता. तो शेवटचा 2023 मध्ये अहिंसा सिनेमात दिसला होता. पण 2008 नंतर तो जवळजवळ या इंडस्ट्रीमधून गायब झाला आणि त्यानंतर 2012 मध्ये पुनरागमन केले. त्यानंतर तो 5 वर्षांनी पडद्यावर दिसला आणि त्यानंतर 7 वर्षांनी चित्रपट मिळाला.

रजतने इंडस्ट्री सोडली का?

याला कारण आहे ‘कोई… मिल गया’ हा चित्रपट. या चित्रपटातून रजतचे अनेक सीन्स कट करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रमोशनल इव्हेंटमध्येही त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर तो खूप निराश झाला आणि त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

रजत कॅनडामध्ये स्थायिक झाला होता

निराश झाल्यानंतर रजत कॅनडाला निघून गेला होता. तेथे त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्याची पत्नी ही आर्किटेक्ट आहे. बिझनेस चांगला चालला, पण रजतला पुन्हा अभिनय करण्याची इच्छा होती. त्यामुळे तो पुन्हा मुंबईला परतला. पण त्याला पुन्हा हवी तशी किर्ती मिळू शकली नाही.

या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.