Disha Patani | सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ‘या’ कारणामुळे झालं टायगर-दिशाचं ब्रेकअप?

टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं कळतंय. दिशाला अनेकदा या जिम ट्रेनरसोबत पाहिलं गेलंय. दिशाच्या या मिस्ट्री मॅनचं नाव ॲलेक्झांडर ॲलेक्स आहे. ॲलेक्झांडर हा दिसायला जितका हँडसम आणि डॅशिंग आहे, तितकाच तो फिटनेस फ्रीकसुद्धा आहे.

Disha Patani | सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'या' कारणामुळे झालं टायगर-दिशाचं ब्रेकअप?
Tiger Shroff and Disha PataniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 2:09 PM

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलिवूडमधील असं कपल होतं, ज्यांनी कधीच त्यांचं प्रेम लपवलं नाही. व्हेकेशन असो किंवा मग सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करणं असतो.. या दोघांनी नेहमीच त्यांचं रिलेशनशिप जगजाहीर केलं होतं. मात्र गेल्या वर्षी या लोकप्रिय जोडीचा ब्रेकअप झाला. या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं, हे कोणालाच समजू शकलं नव्हतं. ब्रेकअपनंतर दिशाचं नाव तिच्या जिम ट्रेनरसोबत जोडलं गेलं. तर टायगर आणि आकांक्षा शर्मा यांच्या डेटिंगच्या चर्चा  समोर आल्या. आता दिशाच्या वाढदिवसानिमित्त टायगरने सोशल मीडियावर तिच्यासोबतचा खास फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडीची चर्चा चाहत्यांमध्ये होऊ लागली आहे.

‘यापुढचा काळ फक्त सर्वोत्कृष्ट असेल. प्रेम आणि हास्य सतत पसरवत राहा’, असं लिहित टायगरने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांची पहिली भेट ‘बेफिक्रे’ या म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी ‘बागी 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं. ‘बागी 3’मधील खास गाण्यासाठीही दिशाने शूटिंग केली होती. एकत्र काम करता करता दोघांमधील जवळीक वाढली. या दोघांना अनेकदा डिनर डेटवर गेल्याचं पहायला मिळालं. टायगरच्या कुटुंबीयांसोबत विशेषकरून त्याच्या बहिणीसोबत दिशाची चांगली मैत्री झाली. ब्रेकअपनंतरही दिशा आणि टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. इतकंच नव्हे तर कोरोना महामारी आणि लॉकडाउनदरम्यान दिशा ही टायगरच्याच घरात राहत होती. जवळपास सहा वर्षे हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते.

हे सुद्धा वाचा

दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपचं कारण हे ‘कमिटमेंट’ देण्यास नकार असल्याचं म्हटलं जातं आहे. दिशाला टायगरसोबत लग्न करायचं होतं. मात्र टायगर त्यासाठी अद्याप तयार नव्हता. टायगरला त्याच्या व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. तर काही रिपोर्ट्सनुसार टायगर आणि आकांक्षा शर्मा यांच्यातील जवळीक वाढल्याने दिशासोबत ब्रेकअप झाल्याचं म्हटलं गेलं.

टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं कळतंय. दिशाला अनेकदा या जिम ट्रेनरसोबत पाहिलं गेलंय. दिशाच्या या मिस्ट्री मॅनचं नाव ॲलेक्झांडर ॲलेक्स आहे. ॲलेक्झांडर हा दिसायला जितका हँडसम आणि डॅशिंग आहे, तितकाच तो फिटनेस फ्रीकसुद्धा आहे. ॲलेक्झांडरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हा दिशाच्याच फोटो आणि व्हिडीओंनी भरलेला पहायला मिळतो. दिशा आणि ॲलेक्झांडरची भेट जिममध्ये झाल्याचं कळतंय. हे दोघं एकत्र वर्कआऊट करायचे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.