हजारो कोटींचा मालक तरीही 1BHK मध्ये का राहतो सलमान खान, काय दिले होते त्याने उत्तर
बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्यांमध्ये सलमान खान देखील आहे. ज्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सलमान खानच्या संपत्तीबाबत बोलायचे झाले तर त्याच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. पण असं असताना देखील सलमान खाने एका छोट्या घरात का बरं राहतो जाणून घ्या.
Salman Khan Houses : सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खान नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून त्याला जीवे मारण्याची धमकी येत आहे. त्यातच त्याच्या घरावर गोळीबार झाल्यावर आता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांच्या चिंता वाढल्या आहेत. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या घरावर गोळीबार केला होता. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे.
सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून करोडो रुपयांचा मालक असूनही 1BHK मध्ये राहत आहे. वांद्रे येथील 1BHK गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहत असल्याची माहिती आहे. ही घटना घडल्यापासून सलमानसोबत त्याचे गॅलेक्सी अपार्टमेंटही चर्चेत आहे.
फराह खानने एकका सलमान खानला तिच्या ‘तेरे मेरे बीच में’ शोमध्ये एक प्रश्न विचारला होता की, ‘एवढा मोठा सुपरस्टार असूनही तू एका खोलीच्या फ्लॅटमध्ये का राहतोस?’ तर भाईजानने यावर सांगितले होते की, त्याची आईही याच इमारतीत राहते. म्हणूनच त्यांना हे घर सोडून कुठेही जायचे नाही आणि नेहमी त्यांच्या कुटुंबाच्या जवळ राहायचे आहे.
सलमान खानची किती घरे आहेत?
सलमान खानकडे अनेक फ्लॅट आहेत. वरळी, कार्टर रोडला देखील त्याचं घर आहे. सलमानने आणखी अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. सीए नॉलेजनुसार, सुपरस्टारचे मालाड, मुंबई आणि बोरिवलीजवळील गोराई बीचवर एक सुंदर हॉलिडे होम आहे.
सलमानकडे फार्महाऊस
सलमान खानकडेही एक भव्य फार्म हाऊस आहे, ज्याची खूप चर्चा असते. सुपरस्टार अनेकदा येथे वेळ घालवत असतो. हे फार्महाऊस पनवेलमध्ये आहे. कोरोना व्हायरसच्या काळातही तो या फार्म हाऊसमध्ये अनेक दिवस राहिला होता. त्याचे हे फार्म हाऊस 150 एकरमध्ये पसरले आहे, ज्यामध्ये सर्व सुविधा आहेत.
दुबईतही एक फ्लॅट
भारताव्यतिरिक्त सलमान खानचे दुबईमध्येही एक आलिशान अपार्टमेंट आहे. मॅजिक ब्रिक्सच्या रिपोर्टनुसार, त्याचा अपार्टमेंट बुर्ज पॅसिफिक टॉवर्समध्ये आहे. सुपरस्टारच्या नेटवर्थबद्दल बोलायचे तर डीएनएच्या रिपोर्टनुसार, सलमान खान 2900 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.