“इंडस्ट्रीतून मला बाहेर फेकलं जाईल”; ‘छावा’ फेम अक्षय खन्ना स्वत:बद्दलच असं का म्हणाला?
'छावा' चित्रपटातील अक्षय खन्नाची औरंगजेबाची भूमिका आणि त्यांची अभिनयाबद्दलची प्रशंसेसोबतच चर्चा झाली ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही. अक्षय खन्ना हा नेहमीच प्रसिद्धी आणि लोकप्रियतेपासून अलिप्त का असतो? त्याने याबद्दल एका मुलाखतीत स्पष्टच उल्लेख केला आहे.

‘छावा’ सिनेमाची क्रेझ आणि त्याची चर्चा आजही कमी होताना दिसत नाहीये. आजही त्या चित्रपटाबद्दल लोकं भरभरून बोलतात. एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचंही तेवढंच कौतुक होत आहे. त्यांने संभाजी महाराजांचं पात्र खरोखरच जिवंत केल्याचं म्हणत सर्वांनीच त्याची प्रशंसा केली.
औरंगजेबाच्या भूमिकेबद्दल अक्षय खन्नाची तेवढीच चर्चा
पण या चित्रपटात अजून एकाची तेवढीच चर्चा झाली ती म्हणजे अभिनेता अक्षय खन्नाची. अक्षय खन्नाच्या पात्राबद्दल आणि त्याने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेबद्दल सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्याची भलेही नकारात्मक भूमिका असो पण त्याच्या दिसण्यापासून ते त्याच्या अॅक्टींगपर्यंत त्याने औरंगजेब खरंच प्रेक्षकांच्या नजरेसमोर उभा केला होता. त्यामुळे जितकं कौतुक विकीने ‘छावा’मध्ये साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला मिळालं तितकीच प्रशंसा औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्नालाही मिळाली.
अक्षय खन्ना प्रसिद्धी आणि लोकप्रियतेपासून अलिप्त का असतो?
पण यासोबतच अक्षय खन्नाची फक्त अभिनयाच्याबाबतीत नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही तेवढीच चर्चा होताना दिसते. कारण तो त्याच्या खासगी आयुष्यातही तेवढाच गुढ व्यक्तिमत्व असणारा आहे.त्याने कधीही स्वतःचं प्रमोशन केलं नाही. कोणत्याही पार्टीत-इव्हेंट किंवा पुरस्कार सोहळ्यात न दिसणारा अक्षय खन्ना प्रसिद्धी आणि लोकप्रियतेपासून काहीसा अलिप्त असतो. अशातच एका मुलाखतीत अक्षय खन्नाने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
“….तर मला इंडस्ट्रीला रामराम ठोकायला जास्त आवडेल”
पण अक्षय खन्नाची एक मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. यात अभिनेत्याने त्याचं परखड आणि स्पष्ट मत व्यक्त केलं होतं. अक्षय म्हणाला की, “तुम्ही किंवा इतर कोणीही मला असं सांगितलं की, मी माझा स्वभाव बदलावा. वारंवार मला कोणत्याही पार्टीत, मुलाखतीत, वादात सहाभागी होऊन काही ना काही कारणाने फक्त चर्चेत राहायचंय. मला हे करावेच लागेल नाहीतर मी फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर फेकला जाईल. तर यावर माझं मत असं असेल की, जर त्यांनी म्हटल्याप्रमाणेच परिस्थिती असेल तर मला इंडस्ट्रीतून बाहेर जायला आवडेल. सतत चर्चेत राहण्यापेक्षा मला इंडस्ट्रीला रामराम ठोकायला जास्त आवडेल. कारण मी या गोष्टींसाठी स्वतःला नाही बदलू शकत. मी जसा आहे तसा आहे.” असं म्हणत त्याने स्वत:चं स्पष्ट मत मांडलं होतं.
अक्षय खन्नाच्या गाजलेल्या भूमिका
अक्षय खन्ना गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अक्षय खन्नाने आजवर साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. अक्षय खन्नाने ‘दिल चाहता है’, ‘गांधी माय फादर’, ‘हलचल’, ‘हंगामा’, ‘दृश्यम २’ अशा सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. सध्या ‘छावा’ सिनेमात अक्षयने साकारलेली औरंगजेबाची भूमिका चांगलीच चर्चेत आहे.