‘बकरा हलाल होने के बाद…’, जिग्ना व्होरा यांनी खऱ्या गुन्हेगारांचा शोध का नाही घेतला?
'बकरा हलाल होने के बाद...', जिग्ना व्होरा यांना हत्या प्रकरणात कोणी अडकवलं होतं? 12 वर्षांच्या संघर्षाबद्दल जिग्ना व्होरा अखेर व्यक्त झाल्याच..., सध्या सर्वत्र जिग्ना व्होरा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा... त्यांच्या संघर्षावर आधारित वेब सीरिज देखील प्रदर्शित...
मुंबई : 1 नोव्हेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून माजी पत्रकार जिग्ना व्होरा तुफान चर्चेत आहे. स्वतःच्या क्षेत्रात नाव मोठं असणाऱ्या जिग्ना व्होरा यांना यश मिळाल्यानंतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, त्यांना तुरुंगात देखील जावं लागलं. जिग्ना व्होरा यांच्या संघर्षावर आधारित एक वेब सीरिज देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. ‘स्कूप’ ही सीरिज चाहत्यांना देखील प्रचंड आवडली. आता जिन्गा व्होरा ‘बिग बॉस 17’ मध्ये एक दमदार स्पर्धक म्हणून भूमिका बजावत आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जिग्ना व्होरा यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र जिग्ना व्होरा यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे…
मुलाखतीत जिग्ना व्होरा यांना, ‘ज्यांनी तुम्हाला हत्या प्रकरणात फसवलं तुम्ही कधी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही का…’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जिग्नो व्होरा म्हणाल्या, ‘बकऱ्याचा बळी दिल्यानंतर सर्वकाही संपून जातं…’ असं जिग्ना व्होरा म्हणाल्या…
‘एकदा बकऱ्याचा बळी दिल्यानंतर काय होतं? त्यानंतर तो बकरा काहीही करु शकत नाही.. माझ्यासोबत देखील असंच झालं आहे. माझा एकदा बळी देण्यात आला आहे. आता मी त्याचं शवविच्छेदन का करु? मला माझे १२ वर्ष पुन्हा मिळणार आहेत का?’ असा प्रश्न देखील जिग्ना व्होरा यांनी उपस्थित केला…
पुढे जिग्ना व्होरा म्हणाल्या, ‘मी कधीच खऱ्या गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही. केला असता तर त्रास मलाच झाला असता. कारण ज्याने मला अडकवलं होतं, तो कोणी जवळचाच असणार आहे. शत्रू किंवा इतर कोणी असं करुच शकत नाही… मी ज्यांना ओळखत आहे, त्यांनीच मला फसवलं आहे…’
हत्या प्रकरणात अडकवल्यानंतर जिग्ना व्होरा यांनी कधीही नकारात्मक वातावरणात स्वतःला ठेवायचं नाही असं वक्तव्य केलं.. ‘तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी स्वतःनकारात्मक वातावरणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.’ जिग्ना व्होरा यांचं धीट असणं, बेधडक पत्रकार असणं, त्यांच्यासाठी रचण्यात आलेल्या कटाचं कारण होतं..असं देखील जिग्ना व्होरा म्हणाल्या.
‘माझ्यासोबत जे झालं ते फार मोठं होतं. पण तुम्ही देखील अनुभवलं असेल की, फक्त महिलाच नाही तर, पुरुषांचं देखील शोषण होतं. कोण तुमचा कशाप्रकारे वापर करेल सांगता येत नाही…’ असं देखील जिग्ना व्होरा म्हणाल्या.. सध्या सर्वत्र जिग्ना व्होरा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.