Sai Pallavi: कोणता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर साई पल्लवीने शॉर्ट ड्रेस घालणं सोडलं; म्हणाली, ‘लोकं थांबून थांबून…’
Sai Pallavi: साई पल्लवी हिच्यासोबत घडलेली 'ती' घटना, अभिनेत्रीचा व्हायरल झालेला 'तो' व्हिडीओ, ज्यानंतर साईने शॉर्ट ड्रेस घालणं केलं बंद... अनेक वर्षांनंतर म्हणाली, 'लोकं थांबून थांबून...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीने सांगितलेल्या घटनेची चर्चा
दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेत्री साई पल्लवी आगामी ‘रामायण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी यांच्या सिनेमात अभिनेत्री सीता यांच्या भूमिकेत दिसणार. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. शिवाय अभिनेत्रीने शॉर्ट ड्रेस घालत का नाही? यामागचं कारण देखील सांगितलं आहे.
साई पल्लवी हिने तिच्यासोबत घडलेली एक घटना सांगत शॉर्ट ड्रेस न घालण्याचं कारण सांगितलं आहे. अभिनेत्रीने सांगितलं, ‘जेव्हा मी जॉर्जिया याठिकाणी शिक्षण घेत होती. तेव्हा मी टँगो डान्सचं प्रशिक्षण घेतलं होतं. एका परफॉर्मन्ससाठी मला स्लिट ड्रेस घालायचा होता. यासाठी मी माझ्या आई-वडिलांची देखील परवानगी घेतली होती. त्यांना देखील यावर कोणती हरकत नव्हती.’
‘जेव्हा माझा पहिला सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा सर्वच स्तरातून माझ्या डान्सचं कौतुक झालं. माझ्या टँगो डान्सचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. लोकं व्हिडीओ पॉज करून करु पाहात होते आणि माझ्या ड्रेसवर कमेंट करत होते. त्यामुळे मला बिलकूल चांगलं वाटत नव्हतं.’
View this post on Instagram
‘तेव्हा झालेल्या घटनेनंतर मी आज अशी आहे. मला असं काहीही करायचं नव्हतं, ज्याचा मला नंतर पश्चाताप होईल. कोणी कसे कपडे घातले आहेत, यावरून त्याचं चारित्र्य ठरवणं चुकीचं आहे. जर तुम्ही माझ्या आई वडिलांना माझ्याबद्दल विचाराल तर, ते म्हणतील मी कधी-कधी खूप ओरडते… माझा राग नियंत्रणाबाहेर जातो…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साई पल्लवी हिची चर्चा रंगली आहे.
साई पल्लवी हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेत्री सीता या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता रणबीर कपूर राम या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. सिनेमात साई आणि रणबीर यांच्यासोबत अभिनेत्री लारा दत्ता, साऊथ सुपरस्टार यश आणि अरुण गोविल यांसारखे सेलिब्रिटी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.
सांगायचं झालं तर, साई पल्लवी हिचा साधा पण सुंदर अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. सोशल मीडियावर देखील साई हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. साई पल्लवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.