शाहरुख खानला कुटुंबासहीत ‘मन्नत’ बंगला का सोडावा लागणार? ‘या’ अभिनेत्याच्या घरात राहणार भाडेतत्त्वावर
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला 'मन्नत' बंगला सोडावा लागणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच तो कुटुंबीयांसोबत एका अभिनेत्याच्या घरात भाडेतत्त्वार राहणार असल्याचे म्हटले जात आहे. आता नेमकं कारण काय चला जाणून घेऊया...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. पण येत्या काळात हा बंगला खाली होणार आहे. बादशाह आपल्या कुटुंबीयांसोबत भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. त्यासाठी शाहरुखने बॉलिवूडमधील एका कलाकाराचे लग्झरी घर भाडे तत्त्वार घेतले आहे. या घरासाठी शाहरुखला करोडो रुपये मोजावे लागणार आहेत. आता नेमकं असं काय झालं की शाहरुखला मन्नत बंगल्यातून बाहेर पडावे लागले चला जाणून घेऊया…
नव्या घराचे भाडे किती?
डेटा एनालिटिक फर्म ‘जॅपकी’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील खार परिसरातील ‘पूजा कासा’ नावाच्या बिल्डींगमध्ये शाहरुख खानने दोन अपार्टमेंट भाडे तत्त्वार घेतले आहे. या दोन अपार्टमेंटसाठी १४ फेब्रुवारी रोजी ‘लीव अँड लाइसेंस अॅग्रीमेंट’ साइन करण्यात आले आहे. अॅग्रीमेंटमध्ये दोन्ही अपार्टमेंटचे एकूण भाडे जवळपास २.९५ कोटी रूपये आहे. म्हणजेच दर महिन्याला शाहरूख २४.१५ लाख रुपये भाडे देणार आहे. या घरासाटी २.२२ लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी आणि २००० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली आहे.




कोणत्या बॉलिवूड कलाकाराचे आहे घर?
शाहरूखने भाडे तत्त्वार घेतलेले हे अपार्टमेंट अभिनेता जॅकी भगनानी आणि त्याची बहिण दीपशिखा देशमुख यांचे आहे. शाहरुख एका घरासाठी ११.५४ लाख रुपये दर महिना भाडे भरणार आहे. त्यासाठी ३२.९७ लाख रुपये सिक्योरिटी डिपॉजिट देण्यात आले आहे. दुसरे अपार्टमेंट हे निर्माता वासू भगनानी यांचे आहे. या घराचे १२.६१ लाख रुपये दर महिना भाडे आहे. तर या घरासाठी ३६ लाख रुपये सिक्योरिटी डिपॉजिट भरण्यात आले आहे. यामधील एक घर हे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आहे. तर दुसरे घर हे सातव्या आणि आठव्या मजल्यावर आहे.
शाहरुखला ‘मन्नत’ बंगला का सोडावा लागला?
असे म्हटले जात आहे की शाहरुखच्या मन्नत बंगल्यामधील आणखी दोन मजले वाढवण्याचे काम सुरु होणार आहे. गौरी खानने ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनजमेंट अॅथॉरिटीकडे बंगल्याचे आणथी दोन अतिरिक्त मजले वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. म्हणजेच ६१६ क्वेअर फूट वाढवण्याची मागणी केली आहे. या कामासाठी परवानगी मिळाल्यामुळे शाहरुख कुटुंबीयांसोबत भाड्याच्या घरात शिफ्ट होणार असल्याचे म्हटले जात आहे.