Junior Mehmood यांचं आयुष्य का झालं उद्ध्वस्त? अंत होता अत्यंत वाईट

| Updated on: Dec 09, 2023 | 1:51 PM

Junior Mehmood : अनेक सिनेमांमध्ये काम केलं, रॉयल आयुष्य जगले... असं असताना का उद्ध्वस्त झालं ज्युनियर महमूद यांचं आयुष्य? शनिवारी ज्युनियर महमूद यांनी घेतला अखेरचा श्वास...पण ज्युनियर महमूद यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात राहतील कायम

Junior Mehmood यांचं आयुष्य का झालं उद्ध्वस्त? अंत होता अत्यंत वाईट
Follow us on

मुंबई | 9 डिसेंबर 2023 : ‘मेरा नाम जोकर’, ‘परवरिश’, ‘हाथी मेरे साथी’ यांसारख्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ज्युनियर महमूद (Junior Mehmood) आज जगात नाहीत. ज्युनियर महमूद आज चाहत्यांमध्ये नसले तरी, त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांमध्ये कायम राहतील. अभिनेत्याला प्रत्येक जण ज्युनियर महमूद म्हणून ओळखतो, पण त्यांचं खरं नाव नईम सैय्यद असं होतं. एक घटनेनंतर नईम सैय्यद यांनी नवीन ओळख मिळाली आणि त्यांना प्रत्येक जण ज्युनियर महमूद म्हणून ओळखू लागले. ज्युनियर महमूद यांनी चाहत्यांना पोट धरुन हासवलं, पण शुक्रवारी ज्युनियर महमूद चाहत्यांना रडवून गेले.

नईम सैय्यद यांना ज्युनियर महमूद म्हणून ओळख का मिळाली?

अभिनेते आणि गायक महमूद यांनी लेकीच्या वाढदिवसासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. तेव्हा गायक महमूद यांनी नईम सैय्यद (ज्युनियर महमूद) यांना बोलावलं नव्हतं. अशात मी छोटा कलाकार आहे म्हणून मला बोलावलं नाही… असं म्हणत नईम सैय्यद यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर गायक महमूद यांनी नईम सैय्यद पार्टासाठी बोलावलं.

दरम्यान, ज्युनियर महमूद यांनी ‘हम काले हैं तो क्या हुआ…’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आणि गायम महमूद यांच्या मनावर राज्य केलं. तेव्हा महमूद यांनी नईम सैय्यद यांना ज्युनियर महमूद असं नाव दिलं. तेव्हापासून नईम सैय्यद यांनी देखील ज्युनियर महमूद म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

हे सुद्धा वाचा

नावामुळे झालं ज्युनियर महमूद यांचं आयुष्य उद्ध्वस्त?

वयाच्या 9 व्या वर्षी ‘मोहब्बत जिंदगी है’ सिनेमात ज्युनियर महमूद यांनी भूमिका साकारली आणि अभिनयात करियरला सुरुवात केली. ज्युनियर महमूद यांनी लहाणपणी त्यांच्या विनोदबुद्धीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर ज्युनियर महमूद 12 वर्षांचे झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली.

नावाच्या पुढे ज्युनियर असणं नईम सैय्यद यांना महागात पडलं. दिवसागणिक त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सिनेमांमध्ये काम मिळणं देखील त्यांना कमी होऊ लागलं. ज्युनियर महमूद यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. ज्युनियर महमूद यांचा अंत देखील फार वाईट होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद आणि त्यांच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे.