अरमान मलिक हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अरमान मलिक हा पायल आणि कृतिका यांच्यासोबत बिग बॉसच्या घरात सहभागी झाला. मात्र, पहिल्याच आठवड्यात पायल मलिक ही बेघर झालीये. पायल मलिक ही बिग बॉस ओटीटी 2 मधून बाहेर पडल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुळात म्हणजे बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना पायल मलिक ही दिसत होती. घरातील इतरही सदस्य बिग बॉसच्या या निर्णयामुळे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. पायल बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर लोक अरमान मलिक याला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.
पायल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर अनिल कपूर हे अरमान मलिक याला विचारतात की, पायल जर बाहेर गेली तर तुला कसे वाटले? यावर अरमान मलिक म्हणाला, जर ती बाहेर जरी गेली तरीही चांगली गोष्ट आहे ती आमच्या चार लेकरांना सांभाळेल. अरमान मलिकचे हे बोलणे ऐकून अनिल कपूर हैराण झाले.
पायलच घराच्याबाहेर जाणार असल्याचे अनिल कपूर यांनी ज्यावेळी सांगितले, त्यावेळी घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसला. मात्र, यावेळी अरमान मलिक हासताना दिसला. यावेळी अरमानने पायलला म्हटले की, काही नाही…यावेळी कृतिका पायलला म्हणते की, तू बाहेर सर्व सांभाळ. आम्ही पण लवकरच येत आहोत.
यावर पायल म्हणते की, लवकर नाही शेवटपर्यंत तुम्हाला थांबायचे आहे. पायल गेल्यानंतर कृतिका ही रडताना दिसली. कृतिका म्हणाली, पायल खूप लवकर गेली. कृतिकाला शांत करत अरमान मलिक म्हणतो की, माझी इच्छा होती की, तिने लढले पाहिजे. परंतू आता ती गेलीये, काही नाही. मी आनंदी आहे.
अरमान मलिकचे हे बोलणे ऐकून अनेकांना वाटत आहे की, पायल गेल्याचा काहीच फरक हा अरमान मलिक याला झाला नाहीये. तो अजिबात दु:खी नसल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. आता यावरून लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पायल मलिक ही आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आलीये आणि तिने व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत.