‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन अगदी पहिल्या एपिसोडपासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहे. यंदाचा सिझन इतका चर्चेत असण्यामागचं एक कारण म्हणजे त्यातील स्पर्धक युट्यूबर अरमान मलिक. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत जेव्हा बिग बॉसच्या घरात आला, तेव्हा अनेकांनी त्याचा विरोध केला. अखेर काही एपिसोड्सनंतर त्याची पहिली पत्नी पायल मलिक घरातून बाहेर पडली. आता बिग बॉसच्या घरात अरमान आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक आहे. या दोघांमुळे आता बिग बॉससमोर एक संकट उभं राहिलं आहे. अरमान आणि कृतिकाने केलेल्या कृत्यामुळे या शोवरच बंदीची टांगती तलवार आहे.
18 जुलै रोजी प्रसारित झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या एपिसोडमध्ये अरमान आणि कृतिका एकमेकांसोबत इंटिमेट होताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ या रिॲलिटी शोमध्ये अश्लिलता दाखवली जात असून हा शो तातडीने बंद करावा, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे. मनिषा कायंदे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या 18 जुलै रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बिभत्स आणि किळसवाणं कृत्य करत असल्याचं पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिलं.
Exclusive:-
Armaan And Kritika are caught doing S€X
Ye Sab Kya Kya Dekhna Pad Ra Hai Family Show Me 😂#ElvishYadav #ElvishArmy #BiggBossOTT3 #LuvKataria #ArmaanMalik #VishalPandey #SaiKetanRao #SanaMakbul https://t.co/vvOZDinLxN
— #BIGBOSS X 👁 (@Bigboss_x0) July 15, 2024
पती अरमान आणि सवत कृतिका यांचा इंटिमेट व्हिडीओ पाहिल्यानंतर पायलने एक व्लॉग शेअर केला. यामध्ये पायलने असा दावा केला आहे की अरमान आणि कृतिकाचा हा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. पायल बिग बॉसच्या घरात गेली होती, त्यामुळे कोणती वस्तू कुठे आहे हे तिला नीट माहित आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या वस्तूंवरून तिने म्हटलंय की अरमान-कृतिकाचा व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. पायल याविषयी म्हणाली, “बिग बॉसच्या घरात काय कुठे आहे, हे मला माहित आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये जिथे बेड दिसतंय आणि त्यावर एक दिवा दिसतोय, ते तिथे नाहीच आहेत. बिग बॉसच्या घरात बेडच्या इथे एक कॅमेरा आणि लाइट आहे. तिथे कोणताच दिवा नाही. व्हिडीओमध्ये दिसणारं ब्लँकेटसुद्धा वेगळं आहे. बिग बॉसच्या घरात राहिलेली व्यक्ती हे सहज ओळखू शकते.”