मलायका अरोरा कोणाला आणि का म्हणली, बिल्डिंगपर्यंत येणार का? व्हिडीओ तुफान व्हायरल
Malaika Arora | बिल्डिंगपर्यंत येणार का? कोणाला म्हणाली मलायका अरोरा... अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल, मलायका अरोरा कायम कोणत्या म कोणत्या कारणामुळे असते चर्चेत... आता देखील अभिनेत्री एका व्हिडीओमुळे आली आहे तुफान चर्चेत...
अभिनेत्री मलायका अरोरा झगमगत्या विश्वातील अशी सेलिब्रिटी आहे जी कधी सिनेमांमध्ये दिसत नाही. पण कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, मलायका हिला पाहिल्यानंतर अभिनेत्रीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं आहे.
मलायका अरोरा शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचली. यावेळी अभिनेत्रीने ऑफ व्हाइट लेहेंगा परिधान केला होता. पण यादरम्यान ती तिच्या लूकमुळे नाही तर तिच्या बोलण्यामुळे चर्चेत आली. मलायका अरोरा इतर अनेक लोकांसोबत चालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीला पाहिल्यानंतर पापाराझी सतत फोटो काढत असतात आणि व्हिडिओ शूट करत असतात. सतत मागे-मागे येत असल्यामुळे विनोदी अंदाजात अभिनेत्री म्हणाली, ‘बिल्डिंगपर्यंत येणार का?’ सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
मलायका अरोरा हिचा मुलगा…
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान याने नुकताच त्याच्या करियरला सुरुवात केली आहे. अरहान याने पॉडकास्ट विश्वात पदार्पण केलं आहे… सध्या अरहान पॉटकास्ट ‘डम्ब बिरयानी’ मुळे तुफान चर्चेत आहे.
‘डम्ब बिरयानी’च्या एका एपिसोडमध्ये मलायका हिने देखील हजेरी लावली होती. तेव्हा आई – मुलातील नातं जगासमोर आलं. मलायका – अरबाज विभक्त झाले असले तरी मुलासाठी कायम एकत्र येतात. अरहान फक्त त्याच्या खासगी आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अरहान याला अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं होतं.
मलायका अरोरा आणि अरबाज खान
मलायका अरोरा आणि अरबाज खान विभक्त झाले आहे. दोघांचं लग्न 1998 मध्ये झालं होतं. दोघांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. घटस्फोटानंतर अरबाज याने शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं तर, मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका – अर्जुन एकत्र आहेत.