Oscar 2022: भडकलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली; उपस्थितांना बसला आश्चर्याचा धक्का!
जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर पार पडतोय. लॉस एंजिलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडत असून दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची (Will Smith) सूत्रसंचालक क्रिस रॉक (Chris Rock) याच्याशी बाचाबाची झाली.
जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर पार पडतोय. लॉस एंजिलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडत असून दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची (Will Smith) सूत्रसंचालक क्रिस रॉक (Chris Rock) याच्याशी बाचाबाची झाली. क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. G.I. Jane या चित्रपटावरून क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाच्या टकलेवरून रॉकने मस्करी केली. जेडाला टक्कल असल्यामुळेच तिला चित्रपटातील भूमिका मिळाली, असं तो म्हणाला. पत्नीची केलेली ही मस्करी विस स्मिथला अजिबात आवडली नाही. तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर गेला आणि क्रिसच्या कानशिलात लगावली.
घडलेला हा प्रकार पाहून सोहळ्यातील उपस्थितांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आणि काही क्षणांसाठी तिथे शांतता पसरली. पुन्हा माझ्या पत्नीचं नाव तुझ्या तोंडून घेऊ नकोस, असा इशारा विलने क्रिसला दिला. क्रिसनेही माफी मागत ते मान्य केलं. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ट्विटरवर यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
ऑस्करमधील बाचाबाचीचा हा व्हिडीओ-
Footage of Will Smith punching Chris Rock after he made a joke about his wife at the #Oscars pic.twitter.com/Hp3k0Do9Qk
— Matt Neglia (@NextBestPicture) March 28, 2022
विल स्मिथला ऑस्कर
विल स्मिथला यावर्षी त्याच्या किंग रिचर्ड या चित्रपटासाठी ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. याच चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
ऑस्कर स्वीकारल्यानंतर विल स्मिथचं भाषण
पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल स्मिथ म्हणाला, “रिचर्ड विलियम्स हे त्यांच्या कुटुंबाचे रक्षक होते. माझ्या आयुष्यातील यावेळी, देवाने मला या जगात काय करण्यासाठी बोलावलं आहे, हे पाहून मी भारावलो आहे. मला अकॅडमीची माफी मागायची आहे, मला माझ्या सर्व सहकारी नामांकित व्यक्तींची माफी मागायची आहे. हा एक सुंदर क्षण आहे आणि मी हा पुरस्कार जिंकल्याबद्दल रडत नाहीये. कला जीवनाचं अनुकरण करतं. मी रिचर्ड विलियम्स यांच्यासारखाच वेड्या वडिलांसारखा आहे. प्रेम तुम्हाला अशा गोष्टी करण्यास भाग पाडतो.” या भाषणाच्या अखेरीस तो म्हणाला, “धन्यवाद. मला आशा आहे की अकॅडमी मला पुन्हा आमंत्रित करेल.”
हेही वाचा:
श्रेयस तळपदे ते मुक्ता बर्वे.. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार
‘अनुपमा’मधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने देवाचं कारण देत अभिनयक्षेत्राला केला रामराम!