देशातील पहिल्या महिला IPS किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा, व्हिडीओ पाहून म्हणाल…
Kiran Bedi Biopic | देशातील पहिल्या महिला IPS किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा, शौर्य, निर्भयता आणि सत्याची जबरदस्त कहाणी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार..., सध्या सोशल मीडियावर सिनेमाच्या दिग्दर्शकाने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा...
देशातील पहिल्या महिला IPS किरण बेदी यांना आज संपूर्ण देश ओळखतो. अनेक तरुणींच्या प्रेरणास्थानी किरण बेदी आहेत. किरण बेदी त्यांच्या बॅचमधील 80 पुरुष पोलिस अधिकाऱ्यांमध्ये फक्त एकट्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. बहिणीची कोणी छेड काढल्यानंतर भर बाजारत त्याला मारलं… त्यांनी मुलींना जागृत करण्याचा निर्धार केला… हुंडा प्रथेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला… शौर्य, निर्भयता, प्रेम, सत्य, सामर्थ्य आणि काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द… आता किरण बेदी यांची संघर्ष प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
किरण बेदी यांच्या बायोपिकचं नाव देखील ‘बेदी’ असणार आहे. 11 जून रोजी दिग्दर्शकांनी सिनेमाची घोषणा करत एक व्हिडीओ शल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक कुशाल चावला यांच्या खांद्यावर आहे. सिनेमाच्या कास्टबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित होईल असं सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, किरण बेदी देशातील फार मोठं नाव आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, किरण बेदी टेनिस प्लेयर देखील आहेत. 1972 मध्ये किरण बेदी IPS झाल्या. त्या देशाच्या पहिल्या IPS महिला आहे. आयपीएस म्हणून 35 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर 2007 मध्ये किरण बेदी निवृत्त झाल्या.
किरण बेदी यांनी आयपीएस म्हणून दिल्ली शिवाय गोवा, चंदीगड आणि मिझोराम येथे सेवा दिली. अमृतसरमध्ये 9 जून 1949 रोजी जन्मलेल्या किरण बेदी यांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम चालवली. तिहार तुरुंगाला मॉडेल जेल बनवण्यात त्यांनी योगदान दिलं. त्यांनी तुरुंगात कैद्यांना धूम्रपान करण्यास बंदी घातली. विपश्यना ध्यानासाठी वर्ग घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले.
किरण बेदी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगयचं झालं तर, किरण बेदी यांची ओळख टेनिस कोर्टमध्ये बृज बेदी यांच्यासोबत झाली. बृज बेदी त्यांच्यापेक्षा 9 वर्ष मोठे होते. 1972 मध्ये बृज बेदी आणि किरण बेदी यांनी लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर किरण बेदी यांनी एका मुलीला जन्म दिला. 31 जानेवारी 2016 मध्ये बृज बेदी यांचं निधन झालं.