KGF 2ने मोठमोठ्या बॉलिवूड निर्माते-दिग्दर्शकांची बोलती केली बंद; कमाईचा आकडा पाहिलात का?
केजीएफ 2 (KGF 2) हा आता 'ऑल टाइम ब्लॉकबस्टर' चित्रपट ठरलाय, असं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने म्हटलंय. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात 'केजीएफ 2'ने 75 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तर प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारी 350 कोटींचा टप्पा पार होईल.
गेल्या काही महिन्यांत दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलिवूड चित्रपटांचाही मार्केट आपल्या अधीन केल्याचं पहायला मिळालं. यामध्ये कन्नड सुपरस्टार यशची (Yash) मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF 2) या चित्रपटाचाही समावेश आहे. दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनला बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) मिळणारा प्रतिसाद पाहून मोठमोठे बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्मातेसुद्धा घाबरले आहेत, अशी प्रतिक्रिया काही कलाकारांनी दिली. ‘केजीएफ 2’ आता 350 कोटींच्या कमाईकडे वाटचाल करतोय. आतापर्यंत या चित्रपटाने 348.81 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ही फक्त ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनची कमाई आहे. जगभरात या चित्रपटाने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. केजीएफ 2 हा आता ‘ऑल टाइम ब्लॉकबस्टर’ चित्रपट ठरलाय, असं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने म्हटलंय. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘केजीएफ 2’ने 75 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. तर प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारी 350 कोटींचा टप्पा पार होईल.
दुसऱ्या आठवड्याची कमाई-
शुक्रवार- 11.56 कोटी रुपये शनिवार- 18.25 कोटी रुपये रविवार- 22.68 कोटी रुपये सोमवार- 8.28 कोटी रुपये मंगळवार- 7.48 कोटी रुपये बुधवार- 6.25 कोटी रुपये गुरुवार- 5.68 कोटी रुपये एकूण- 348.81 कोटी रुपये
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-
#KGF2 is now ALL TIME BLOCKBUSTER… EXCELLENT Week 2, collects ₹ 75 cr+, TERRIFIC… Will cross ₹ 350 cr today [third Fri]… [Week 2] Fri 11.56 cr, Sat 18.25 cr, Sun 22.68 cr, Mon 8.28 cr, Tue 7.48 cr, Wed 6.25 cr, Thu 5.68 cr. Total: ₹ 348.81 cr. #India biz. #Hindi pic.twitter.com/QGkOxT6723
— taran adarsh (@taran_adarsh) April 29, 2022
पहिल्या आठवड्याची कमाई- 268.63 कोटी रुपये (गुरुवारी प्रदर्शित झाल्याने 8 दिवसांची कमाई) दुसऱ्या आठवड्याची कमाई- 80.18 कोटी रुपये एकूण- 348.81 कोटी रुपये
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-
#KGF2 biz at a glance… ⭐ Week 1: ₹ 268.63 [Thu release; 8 days] ⭐ Week 2: ₹ 80.18 cr Total: ₹ 348.81 cr#KGF2 benchmarks… Crossed ₹ 50 cr: Day 1 ₹ 100 cr: Day 2 ₹ 150 cr: Day 4 ₹ 200 cr: Day 5 ₹ 250 cr: Day 7 ₹ 300 cr: Day 11 ₹ 325 cr: Day 12#India biz. #Hindi pic.twitter.com/zKMCDii8K0
— taran adarsh (@taran_adarsh) April 29, 2022
केजीएफ 2 चे बेंचमार्क्स-
पहिला दिवस- 50 कोटींचा टप्पा पार दुसरा दिवस- 100 कोटी रुपये चौथा दिवस- 150 कोटी रुपये पाचवा दिवस- 200 कोटी रुपये सातवा दिवस- 250 कोटी रुपये अकरावा दिवस- 300 कोटी रुपये बारावा दिवस- 325 कोटी रुपये