14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी साखरपुडा करण्याच्या चर्चांवर अखेर ‘ये रिश्ता..’ फेम शिवांगीने सोडलं मौन

'बरसातें' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कुशल टंडन लवकरच साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर अखेर दोघांनी मौन सोडलं आहे. शिवांगी आणि कुशलने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली आहे.

14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी साखरपुडा करण्याच्या चर्चांवर अखेर 'ये रिश्ता..' फेम शिवांगीने सोडलं मौन
Shivangi Joshi and Kushal TandonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 4:47 PM

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशीने ‘बरसातें’ या मालिकेत अभिनेता कुशल टंडनसोबत काम केलं. या मालिकेत दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर हिट ठरली. पण त्याचसोबत खऱ्या आयुष्यातही शिवांनी आणि कुशल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं लवकरच साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता शिवांगी आणि कुशलने प्रतिक्रिया दिली आहे. दोघांनीही या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलंय.

कुशलसोबत साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान शिवांगीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने लिहिलंय, ‘मला अफवा आवडतात. मला माझ्याविषयी ज्या रंजक गोष्टी माहीत नाहीत, त्या मला या अफवांमधून ऐकायला मिळतात.’ शिवांगीने यात थेट कोणाचंही नाव घेतलं नाही. तर दुसरीकडे कुशलने त्याच्या पोस्टद्वारे या चर्चांना नाकारलं आहे. त्याने यात त्याच्या साखरपुड्याचाही उल्लेख केला आहे.

हे सुद्धा वाचा

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘मला एक गोष्ट सांगा की माझा साखरपुडा होतोय आणि त्याबद्दल मलाच माहीत नाही? मी इथे थायलंडमध्ये मार्शिअल आर्ट्स शिकतोय. तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? किंमान आधी बातमीचे तथ्य तरी तपासा. तुमचे सूत्र कोण आहेत?’ या पोस्टसोबतच त्याने मार्शियल आर्ट्स शिकतानाचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे.

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘बरसातें’ ही मालिका गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे. मालिकेत एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यांची ही केमिस्ट्री ऑफस्क्रीनसुद्धा झळकायची, म्हणून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

याआधी शिवांगीचं नाव ‘बालिका वधू 2’मधील सहअभिनेता रणदीप रायशी जोडलं गेलं होतं. 2022 मध्ये शिवांगीने या चर्चांना फेटाळलं होतं. रणदीप हा माझा चांगला मित्र आहे, असं तिने स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे कुशल हा अभिनेत्री गौहर खानला डेट करत होता. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र वर्षभरातच त्यांचं नातं संपुष्टात आलं. 2014 मध्ये त्यांनी ब्रेकअप केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.