यंदाच्या २०२४ वर्षात सर्वाधिक कमाई करणारे ‘हे’ अभिनेते टॉपवर, यादीत बॉलिवूडच्या अभिनेत्याचेही नाव

जगभरात सार्वधिक मानधन घेऊन जास्त कमी करणाऱ्या अभिनेत्यांची यादी समोर आलेली आहे. यात सर्वत्र हॉलिवूड, बॉलीवूड, सारख्या सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्यांची नाव यादीत आले असून ते जगातील सर्वाधिक कमाई करणारे टॉपचे अभिनेते ठरले आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रेमाने आजही त्यांची चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत.

यंदाच्या २०२४ वर्षात सर्वाधिक कमाई करणारे 'हे' अभिनेते टॉपवर, यादीत बॉलिवूडच्या अभिनेत्याचेही नाव
money
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 1:31 PM

Top World’s Highest-Paid Actors: चित्रपटांच्या दुनियेत अनेकदा कलाकारांना त्यांच्या भूमिकेसाठी वेगवेगळे मानधन दिले जाते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण यावर्षीच्या सर्वे मधून संपूर्ण मराठी सिनेसृष्टी, बॉलीवूड, हॉलिवूड, यासारख्या अनेक सिनेसृष्टीतून जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या टॉप १० अभिनेत्यांनी हा मान कमावला आहे. तर या अभिनेत्यांनी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या कामातून खूप आर्थिक यश मिळवले आहे. या कलाकारांनी केवळ प्रेक्षकांना आकर्षित केले नाही तर त्यांच्या चांगल्या कमाईस हातभार लावणारे आकर्षक योगदान देखील मिळवले आहेत. तर यंदाच्या २०२४ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत कोणाचे नाव आहे ते जाणून घेऊयात.

सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत ‘हा’ अभिनेता टॉपवर

हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन त्याच्या अभिनय क्षेत्रात सार्वधिक मानधन घेणारा व यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये जगामध्ये टॉपवर आहे. ॲक्शनपॅक्ड सारख्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा जॉन्सनचे अनेक चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर सातत्याने फेव्हरेट ठरलेले आहे. चित्रपटातील अभिनयातून प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला भरीव मानधन मिळाले आहे, ज्यामुळे तो अलीकडच्या वर्षांत सर्वात आर्थिकदृष्ट्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.

रायन रेनॉल्ड्स हा एक हॉलिवूड अभिनेता आहे ज्याची जागतिक स्थरावर चांगली कमाई वाढली आहे. या अभिनेत्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे सर्वाधिक मानधन घेऊन अधिक कमाई करणारा जगातला टॉप अभिनेता ठरलेला आहे. चित्रपटाच्या सहभागामुळे रेनॉल्ड्स घराघरांत प्रसिद्ध झाला आहे. या अभिनेत्याला मिळालेला त्याच्या लोकप्रियतेचा पाठिंबा आणि हॉलिवूडमधील त्यांच्या अभिनयामुळे उमटलेली छाप हे आर्थिक यशाचे कारण आहे.

मार्क वाहलबर्गनेही त्याच्या उत्कृष्ट कमाईने सार्वधिक मानधन घेऊन कमाई करणाऱ्यांच्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या अभिनेत्याने जबरदस्त अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या वाहलबर्ग यांनी जगभरातील प्रेक्षकांना त्याच्या अभिनयातून प्रभावित करणाऱ्या विविध भूमिका साकारल्या आहेत.

बेन ॲफ्लेकच्या मोठ्या पडद्यावर पुन्हा परतल्याने लोकांनी त्यांचे स्वागत केले आहे. याच दरम्यान पुन्हा अभिनय क्षेत्रात परतल्याने परिणामी त्याची चांगली कमाई झाली आहे. अश्यातच ॲफ्लेकचा अभिनय प्रेक्षकांना आकर्षित करत राहिला आहे, ज्यामुळे इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याचे स्थान निश्चित झाले आहे. त्यांच्या कामाबद्दलची निष्ठा आज त्यांच्या यशात स्पष्टपणे दिसून येते आणि ते या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

विन डीजल हा अभिनेता ॲक्शन सिनेमांमधील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे, जागतिक स्थरावर सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये डीजलच्या सहभागामुळे वर्षानुवर्षे एकच कमाई सुनिश्चित झाली आहे. या सोबतच जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्यांची उपस्थिती आणि रसिकांमध्ये असलेले त्यांचे कायमचे आकर्षण अधोरेखित करते. विन डिझेल या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

याशिवाय आपल्या हिंदी सिनेसृष्टीमधील अक्षय कुमार हा एक भारतीय अभिनेता आहे जो भरपूर पैसे कमावून या जागतिक व्यासपीठावर बॉलिवूडचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच आणखीन विल स्मिथचा या यादीत समावेश केल्याने त्याची कायमची लोकप्रियता आणि त्याच्या भूमिकांसाठी जास्त कमाई मिळविण्याची क्षमता देखील दिसून येते. याशिवाय लिन-मॅन्युअल मिरांडा यांचाही जगातील सार्वधिक कमाई करणारे अभिनेता म्हणून यादीत समावेश आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.