दोन वर्षांनंतर विशालने उचललं ‘हे’ पाऊल; आषाढी एकादशीनिमित्त दिसणार नवं रुप

'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये पूजा बिरारी आणि विशाल निकम यांच्या मुख्य भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय.

दोन वर्षांनंतर विशालने उचललं 'हे' पाऊल; आषाढी एकादशीनिमित्त दिसणार नवं रुप
Vishal NikamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 12:03 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. आजवर मालिकेत प्रेक्षकांनी रायाचं रांगडी रुप पाहिलं आहे. दाढी-मिश्या आणि केस वाढवून आपल्या मित्रांसोबत गावभर हिंडणाऱ्या रायाला प्रेक्षकांनी पाहिलंय. मात्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने रायाचा कायापालट होणार आहे. नव्या रुपातला राया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरवर फणसासारखा काटेरी आणि कठोर वाटत असला तरी राया प्रचंड प्रेमळ आहे. नव्या रुपासह रायाचा हाच प्रेमळ स्वभावही यापुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

विठुरायाचं आशीर्वाद घेत रायाच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे. रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने तब्बल दोन वर्षांनंतर आपल्या केसांना कात्री लावली आहे. याविषयी सांगताना विशाल म्हणाला, “कथानकाची गरज म्हणून जे काही करणं गरजेचं आहे ते करणं हे कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. रायाचा लूक चेंज ही कथानकाची गरज होती. गेली दोन वर्षे एका सिनेमासाठी मी केस वाढवत होतो. योगायोगाने येड लागलं प्रेमाचं मालिकेसाठी माझी याच लूकमध्ये निवड झाली. दोन वर्षांनंतर मी स्वत:ला अशा रुपात पहाणार आहे. मी माझा लूक नक्कीच मिस करेन. मला या रुपात पाहून माझ्या आईला सर्वाधिक आनंद होणार आहे. मला खात्री आहे रायाचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.”

विशाल निकमचा नवीन लूक

हे सुद्धा वाचा

ज्याप्रमाणे रायाची विठुरायावर प्रचंड श्रद्धा आहे त्याप्रमाणेच रायाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचंही विठुरायासोबत खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो असं विशाल सांगतो. विशालच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. “हरिपाठ, ज्ञानेश्वरी, कीर्तन आणि प्रवचन ऐकत ऐकत मी मोठा झालो. घरच्यांसोबत मी अनेकदा वारीमध्ये सहभागी होत विठुरायाचं दर्शन घेतलं आहे. विठुराया माझं लाडकं दैवत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. येड लागलं प्रेमाचं या मालिकेची गोष्टदेखील पंढरपुरात घडते. ही माऊलींचीच कृपा आहे. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो,” अशी भावना विशालने व्यक्त केली.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.