Deepika Padukone | रणवीर सिंग नाही तर, एक्स बॉयफ्रेंडचा फोटो शेअर करत दीपिका म्हणाली, ‘हृदयाचा तुकडा…’

एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर याच्यासोबत खास फोटो शेअर करत म्हणाली, 'हृदयाचा तुकडा...', फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल..

Deepika Padukone | रणवीर सिंग नाही तर, एक्स बॉयफ्रेंडचा फोटो शेअर करत दीपिका म्हणाली, 'हृदयाचा तुकडा...'
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 6:30 PM

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोन हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. दीपिकाने स्वतःला फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित न ठेवता हॉलिवूडमध्ये देखील उत्तम कामगिरी करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारी दीपिका आता देखील एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहे. एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर याच्यासोबत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. फोटोंमुळे तर दीपिका चर्चेत तर आलीच आहे, पण फोटोला दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र दीपिका पादुकोण आणि तिच्या सोशल मीडियावर पोस्टची चर्चा आहे.

अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत फोटो का पोस्ट केले असतील? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या मागे देखील एक खास कारण आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘ये जवानी है दीवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani) सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. याच कारणामुळे अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहेत.

हे सुद्धा वाचा

सिनेमात रणबीर कपूर यांच्यासोबत असलेल्या सीनमधील काही फोटो दीपिकाने पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत दीपिकाने कॅप्शनमध्ये, ‘माझ्या हृदयाचा तुकडा..’ असं लिहिलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या नात्याची चर्चा होती.

‘ये जवानी है दीवानी’ सिनेमातील रणबीर आणि दीपिकाच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आजही सोशल मीडियावर सिनेमातील काही सीन तुफान व्हायरल होत असतात. शिवाय सिनेमातील गाणी आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतात… आजही ‘ये जवानी है दीवानी’ सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

फक्त दीपिका पादुकोण हिनेच नाही तर, सिनेमाचा निर्माता करण जोहर याने देखील सिनेमासंबंधीत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत करण याने कॅप्शनमध्ये, ‘वेळ कशी निघून जाते कळतच नाही…खासकरून जेव्हा ये जवानी है दिवानी या सिनेमा विचार केला जातो… हा सिनेमा कधीही जुना होऊ शकत नाही. ही एक खास कथा आहे जी केवळ लोकांच्या हृदयातच  नाही तर तरुण पिढीलाही जोडून ठेवते…’ असं करण म्हणाला..

‘ये जवानी है दिवानी’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. सिनेमातील अनेक सीन आणि डायलॉग चाहत्यांच्या मनात आजही आहेत. सिनेमा २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने तुफान कमाई केली. दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडले होते…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.