‘हर हर महादेव, अब तो घर घर महादेव’, इंडियन आयडल शोमध्ये बाबा रामदेव असं का म्हणाले?

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर इंडियन आयडल शोमध्ये बाबा रामदेव म्हणाले, ‘हर हर महादेव, अब तो घर घर महादेव’... व्हिडीओ व्हयारल झाल्यानंतर सर्वत्र चर्चा

‘हर हर महादेव, अब तो घर घर महादेव’, इंडियन आयडल शोमध्ये बाबा रामदेव असं का म्हणाले?
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 12:11 PM

Indian Idol 13: योग गुरु बाबा रामदेव (yoga guru baba ramdev) यांनी आतापर्यंत अनेक शोमध्ये हजेरी लावली. शोच्या माध्यमातून त्यांनी स्पर्धकांना आणि प्रेक्षकांचा योग आणि जीवनाचं महत्त्व सांगितलं. माहाशिवरात्रीच्या मुहूर्तावर इंडियन आयडल (Indian Idol 13) शोमध्ये बाबा रामदेव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. शोमध्ये बाबा रामदेव यांनी अनेक स्पर्धकांनी गायलेली गाणी ऐकली आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देखील केलं. शोमधील काही स्पर्धकांचा आवाज तर बाबा रामदेव यांना प्रचंड आवडला. अनेक स्पर्धकांचा आवाज ऐकल्यानंतर बाबा रामदेव यांनी स्पर्धकांचं कौतुक देखील केलं. सध्या स्पर्धक आणि बाबा रामदेव यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सोनी टीव्हीने महाशिवरात्रीचा स्पेशल एपिसोडचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शोच्या ४७ व्या एपिसोडमध्ये बाबा रामदेव यांनी प्रचंड मस्ती केली. दरम्यान शोचे परीक्षक विशाल ददलानी याने बाबा रामदेव यांना स्पर्धक चिरागला काहीतरी शिकवायला सांगितलं. विशाल म्हणतो की चिरागला फक्त एकच आसन माहीत आहे आणि ते ही गुडघे टेकवण्याचा आसन. यावर बाबा रामदेव मंचावर जातात आणि चिरागला सल्ला देतात. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

पुढे बाबा रामदेव म्हणतात, ‘संगीत, नृत्य आणि शिव आपल्या आयुष्यात उत्साह निर्माण करतात. आमच्या कंटाळवाण्या जीवनात आनंद निर्माण करतात. भीती आणि हसू एकत्र येतं.’ सध्या बाबा रामदेव यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (indian idol 13 start date)

चिराग याचा आवाज बाबा रामदेव यांना प्रचंड आवडला. त्याच्या आवाजाचं कौतुक करत बाबा रामदेव म्हणाले, ‘हर हर महादेव, या महाशिवरात्रीत तर सोनी टीव्हीने घरा-घरात महादेव पोहोचवले आहेत. आज शिव यांची कृपा चिराग याच्यावर झाली आहे..’ असं देखील बाबा रामदेव म्हणाले.

एका अन्य स्पर्धक ऋषी याचं कौतुक करत बाबा रामदेव म्हणतात, ‘ऋषी तू शिव होवो अथवा नको. पण तू खरोखरच रामाच्या अयोध्येतून आला आहेस, तू एक अतिशय चांगला मुलगा आहेस. जो कायम सन्मानाने राहतो आणि सन्मानाने गातो. यावेळची शिवरात्री केवळ देशासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक असणार आहे.’ असं देखील बाबा रामदेव स्पर्धकांचं मनोबळ वाढवण्यासाठी म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.