Bigg Boss 17 : ‘तू फक्त माझा वापर केलास…’, अंकिता लोखंडे हिने पती विकी जैनवर साधला निशाणा

Bigg Boss 17 : विकी जैन याच्यासोबत लग्न केल्याचा अर्चना लोखंडे हिला होत आहे पश्चाताप...; अभिनेत्री पतीला म्हणाली, 'तू फक्त माझा वापर केलास...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी जैन आणि अर्चना लोखंडे यांच्या नात्याची चर्चा... अभिनेत्रीचं वक्तव्य जाणून चाहते थक्क

Bigg Boss 17 : 'तू फक्त माझा वापर केलास...', अंकिता लोखंडे हिने पती विकी जैनवर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 9:37 AM

मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : अभिनेता आणि होस्ट सलमान खान याच्या ‘बिग बॉस 17’ मध्ये सतत ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सतत भांडणं, वाद.. यांमुळे चर्चेत असलेल्या बिग बॉसच्या घरात मोठे बदल होणार आहेत. शोमधील सर्व स्पर्धकांचे रुम आता बदलण्यात येणार आहेत. सांगायचं झालं तर, दिवाळी आणि ‘टायगर 3’ सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे बिग बॉसमध्ये एलिमिनेशन झालं नाही. पण आता स्पर्धकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं चित्र दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये सतत खटके उडताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये विकी आणि अंकिता यांचे रुम देखील बदलणार आहेत.

येत्या एपिसोडमध्ये बिग बॉस अंकिताला म्हणतात, ‘अंकिता… तू इतकी उदास का आहेस? तू ज्याच्यासाठी उदास आहेस, तो बाहेर आनंदात आहे….’ असं म्हणत बिग बॉस अभिनेत्रीच्या जखमांवर मलम लावताना दिसले… अशात अंकिता प्रचंड रागावली. विकी पत्नी अंकिता हिला समजावण्याचा प्रयत्न करताना पुढील एपिसोडमध्ये दिसणार आहे.

संतापली अंकिता लोखंडे

समजावायला आलेल्या विकीला अंकिता म्हणाली, ‘आता हे सगळ काहीही करु नकोस. तू प्रचंड स्वार्थी आहेस. तुझ्यासोबत राहून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आता विसर तू आपलं लग्न झालं आहे. आजपासून आपण वेगळे झालो आहोत. तू फक्त माझा वापर केला आहे. आता तू जा माझ्या समोरुन…’ अंकिता संतापल्यानंतर विकी काय करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता आणि विकी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चे पुढील एपिसोड कसे असतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोशल मीडियावर देखील अंकिता आणि विकी यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

‘बिग बॉस’ च्या घरात सतत अंकिता आणि विकी यांची भांडणं होताना दिसतात. सांगायचं झालं तर, अंकिता हिला अनेकदा बिग बॉस शोसाठी ऑफर आली. पण अभिनेत्री कधीही बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला नाही. आता विकी जैन याला बिग बॉस शोमध्ये यायचं होतं, म्हणून अभिनेत्री पतीसोबत बिग बॉसमध्ये आली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.