आईचे पाय धुऊन पिणारा ‘हा’ मुलगा गडगंज संपत्तीचा मालक, चाहत्यांच्या मनात त्याचच राज्य
Bollywood : जन्मानंतर फोटोत दिसणाऱ्या मुलाल वडिलांनी स्वीकारलं नाही; आईचे पाय धुऊन पिणारा ‘हा’मुलगा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता... फोटोत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखलं... कायम अभिनेत्याची सर्वत्र रंगत असते चर्चा...
मुंबई | 31 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी कलाकार कायम प्रयत्न आणि मेहनत करत असतात. काही कलाकारांना यश लवकरत मिळतं, तर काही कलाकारांना प्रचंड मेहनत आणि प्रतीक्षा करावी लागते. दरम्यान सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही कदाचित ओळखलं नसेल. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते गोवींदा आहेत. गोवींदा यांनी आपल्या अभिनयाने आणि भन्नाट डान्सने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा यांची चर्चा रंगली आहे.
आज गोविंदा यांना कोणत्या ओळखीची गरज नाही. आजच्या घडीला संपत्ती, प्रसिद्धी, पैसा… गोविंदा यांच्याकडे आहे. पण एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याकडे आई – वडिलांचं प्रेम देखील नव्हतं. फक्त प्रोफेशनल आयुष्यातच नाही तर, खासगी आयुष्यात देखील गोविंदा यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गोविंदाने एकदा सांगितलं होतं की, अभिनेत्याच्या जन्मानंतर वडिलांनी गोविंदा यांना स्वीकारण्यास नकार दिला.
खासगी आयुष्याबद्दल एकदा खुद्द गोविंदा यांनी मोठा खुलासा केला होता. ‘माझ्यामुळे आई साध्वी होण्याचा निर्णय घेत आहे. आणि माझ्या वडिलांकडे दुर्लक्ष करत आहे… असं माझ्या वडिलांना कायम वाटायचं.’ रिपोर्टनुसार, लहानपणी गोविंदा यांनी आईचं देखील मिळालं नाही.
पुढे गोविंदा म्हणाले, ‘साध्वी झाल्यानंतर अनेकांनी माझ्या आईला सांगितलं, तुमचा मुलगा फार गोंडस आहे.. तेव्हा आई पुन्हा माझ्या जवळ आली… मी माझ्या आईवर प्रचंड प्रेम करतो…’ असं देखील गोविंदा म्हणाले. एवढंच नाही तर, गोविंदा आईला एखाद्या देवीप्रमाणे पुजतात. आईचे पाय धुवून पित असल्याचं देखील अभिनेत्याने अनेकदा सांगितलं. गोविंदा आज बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेते आहेत.
एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र गोविंदाची क्रेझ होते. गोविंदाच्या प्रत्येक सिनेमाने चाहत्यांने भरभरुन मनोरंजन केलं. आज गोविंदा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसले तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर देखील गोविंदा यांचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, अनेक कार्यक्रमांमध्ये गोविंदा यांना कुटुंबासोबत स्पॉट केलं जातं.