KBC 12 | कमजोरीला बनवले शस्त्र, तुम्हाला माहितीय अरुणिमा सिन्हा यांचा थक्क करणारा प्रवास?

संकटांचा डोंगर समोर असताना देखील न डगमगता त्याला सोमोरे जाणाऱ्या अरुणिमा सिन्हा आहे. आज, 'कौन बनेगा करोडपती' सीझन 12 (KBC 12) च्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये अरुणिमा सिन्हा येणार आहेत.

KBC 12 | कमजोरीला बनवले शस्त्र, तुम्हाला माहितीय अरुणिमा सिन्हा यांचा थक्क करणारा प्रवास?
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 2:59 PM

मुंबई : संकटांचा डोंगर समोर असताना देखील न डगमगता त्याला सोमोरे जाणाऱ्या अरुणिमा सिन्हा आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन 12 (KBC 12) च्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये अरुणिमा सिन्हा येणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसणार आहेत. अरुणिमा सिन्हा ही एक अशी व्यक्ती आहे की, अपघातात पाय गमावले पण त्यांनी कधीही हार मानली नाही. एक पाय गमावल्यामुळे, ज्यांनी अरुणिमाला कमकुवत मानले, त्यांनी पद्मश्री विजयाने आपले हत्यार बनवले. (KBC 12 You know the astonishing journey of Arunima Sinha)

शो दरम्यान, अमिताभने अरुणिमाला विचारतात की, एव्हरेस्ट चढणे ही एक सोप्पी गोष्ट नाही, किती लोकांनी प्रयत्न केला असेल, सोडून दिले असते, परंतु तुम्ही या अवस्थेत एव्हरेस्टची यशस्वी चढाई कशी केली ? यावर अरुणिमा म्हणाल्या- “मी जेव्हा रुग्णालयाच्या पलंगावर होते आणि बातम्या येत होत्या की, अरुणिमाकडे तिकीट नव्हते टीटीने तिकीट मागितल्यावर अरुणिमाने उडी मारली. दुसर्‍या दिवशी मी पाहिले की असे लिहिले होते की अरुणिमा आत्महत्येसाठी गेली होती.

त्या पुढे म्हणाल्या की, मी पुढे पाहिले की, पुढच्या पानावर गिर्यारोहणाचा एक लेख होता, त्यात माउंट एव्हरेस्टचे मा्र्ग देण्यात आले होते. मी ते वाचले आणि मनात ठरविले की, ज्याला लोक सर्वात मोठी कमजोरी मानतात त्यालाच मी माझे शस्त्र बनवले आणि नंतर मी एव्हरेस्टची चढाई यशस्वीपणे पूर्ण केली. अरुणिमा सिन्हा एक अशी व्यक्ती आहे की, त्यांच्या जिद्दीसमोर एव्हरेस्टही छोटे पडले. अरुणिमा हा देशातील पहिला दिव्यांग गिर्यारोहक ठरल्या आहेत. २०११ मध्ये व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू अरुणिमा यांना काही गुंडांनी चालत्या ट्रेनमधून खाली फेकले होते. अरुणिमा सिन्हा असह्य वेदनेने रात्रभर रेल्वे रुळावर पडून होत्या. या घटनेत त्यांना एक पाय गमवावा लागला आणि दुसर्‍या पायात रॉड बसविण्यात आला. जणू सुवर्ण कारकीर्दीमध्ये ब्रेक लागला होता. पण अरुणिमा कधीच हरायला शिकल्या नाहीत. त्यानी मनात ठरवले की काहीतरी करावे लागेल, दोन वर्षातच अरुणिमाने स्वत: ला तयार केले आणि जगातील सर्वात उंच डोंगर माउंट एव्हरेस्ट वर चढाई करून देशाचा तिरंगा फडकवला. केवळ माउंट एव्हरेस्टच नाही तर त्यांनी आणखी दुर्गम डोंगरांवर चढाई केली. 2015 मध्ये अरुणिमाला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

संबंधित बातम्या :

जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात…

Indoo Ki Jawani | कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ चित्रपट प्रदर्शित, कोरोना काळातही बॉक्स ऑफिसवर धमाल होणार?

(KBC 12 You know the astonishing journey of Arunima Sinha)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.